35 लाखांची केळी कुणी खाल्ली? भारतीय क्रिकेटमध्ये चक्रावून टाकणारा 'बनाना घोटाळा', BCCI ला हायकोर्टाची नोटीस
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
12 कोटी रुपयांचा फंड आणि 35 लाख केळी... भारतीय क्रिकेटमध्ये केळ्यांचा घोटाळा समोर आला आहे. केळ्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : 12 कोटी रुपयांचा फंड आणि 35 लाख केळी... भारतीय क्रिकेटमध्ये केळ्यांचा घोटाळा समोर आला आहे. केळ्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता बीसीसीआयला हायकोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये 12 कोटी रुपयांच्या सरकारी निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप होत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कोर्टामध्ये एक ऑडिट रिपोर्ट दाखवण्यात आला, ज्यामुळे 35 लाख रुपये खेळाडूंच्या केळ्यांवर खर्च झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.
आता 35 लाख रुपयांची केळी कशी खाल्ली जाऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी जस्टीस मनोज कुमार तिवारी यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. हे संपूर्ण प्रकरण क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंड (CAU) संबंधी आहे.
देहराडूनचे रहिवासी संजय रावत आणि अन्य काही जणांनी याप्रकरणी याचिका दाखल केली. 2024-25 च्या आर्थिक वर्षात असोसिएशनने 6.4 कोटी रुपये इव्हेंट मॅनेजमेंटवर आणि जवळपास 26.3 कोटी रुपये स्पर्धा आणि ट्रायलवर खर्च केल्याचं दाखवलं आहे. मागच्या वर्षी हा खर्च 22.3 कोटी रुपये होता.
advertisement
खाणं-पिणं आणि आयोजनाच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसंच खेळाडूंना आश्वासन दिलेल्या सेवाही त्यांना मिळालेल्या नाहीत, असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. कोर्टाने प्रकरणाचं गांभिर्य पाहून याप्रकरणाची सुनावणी 12 सप्टेंबरला ठेवली आहे.
Location :
Dehradun,Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
September 10, 2025 4:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
35 लाखांची केळी कुणी खाल्ली? भारतीय क्रिकेटमध्ये चक्रावून टाकणारा 'बनाना घोटाळा', BCCI ला हायकोर्टाची नोटीस