Yashasvi Jaiswal : 'आमच्या बॉलर्सना एवढं मारू नको', ब्रायन लाराने ऑन कॅमेरा दिली यशस्वीला धमकी? Video आला समोर!

Last Updated:

Brian Lara meet Yashasvi Jaiswal : रविवारी सकाळी बीसीसीआयच्या (BCCI) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सध्या दिल्लीत असलेल्या लाराने जयस्वालला मिठी मारून शुभेच्छा दिल्या.

Brian Lara meet Yashasvi Jaiswal
Brian Lara meet Yashasvi Jaiswal
Brian Lara Hugs Yashasvi Jaiswal : दिल्ली येथील कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वी जयस्वालने 175 धावांची दमदार इनिंग खेळली. भलेही जयस्वालला डबल सेंच्युरी पूर्ण करता आली नाही, पण त्याने आपल्या बॅटिंगने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये जायसवालने 22 फोर मारत 258 बॉलमध्ये 175 धावांची अविस्मरणीय इनिंग खेळली. अशातच ब्रायन लाराने यशस्वीचं कौतूक केलंय.

ब्रायन लाराकडून यशस्वीचं कौतुक

जयस्वालच्या 175 आणि शुभमन गिलच्या 129 धावांच्या जोरावर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 518 धावा केल्या. बॅटने केलेल्या या शानदार प्रदर्शनाबद्दल मुंबईच्या या युवा खेळाडूला वेस्ट इंडिजचे (West Indies) माजी कॅप्टन आणि महान बॅट्समन ब्रायन लाराकडून (Brian Lara) देखील खूप कौतुक मिळालं.

आमच्या बॉलर्सना एवढं मारू नकोस

advertisement
रविवारी सकाळी बीसीसीआयच्या (BCCI) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सध्या दिल्लीत असलेल्या लाराने जयस्वालला मिठी मारून शुभेच्छा दिल्या आणि त्याला एक खास विनंती केली. लारा म्हणाले, "आमच्या बॉलर्सना एवढं मारू नकोस." यावर जयस्वालने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मी नेहमी प्रयत्न करतो की... 

advertisement
जयस्वालने लाराचं बोलणं ऐकून लगेच 'नाही सर, असं नाहीये' अशी प्रतिक्रिया दिली. बॅटिंगच्या वेळी आपली मानसिकता कशी असते, याबद्दल बोलताना जयस्वाल म्हणाला की, मी नेहमी प्रयत्न करतो की, मैदानात जास्तीत जास्त वेळ थांबावं, असं जयस्वाल तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीआधी म्हणाला.

जास्तीत जास्त वेळ बॅटिंग करावी

दरम्यान, मी नेहमी टीमला प्रथम स्थान देतो आणि विचार करतो की मी टीमसाठी कसं खेळू शकतो आणि त्यावेळी टीमसाठी काय महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी नेहमी असाच विचार करतो, यामुळे मला कसे खेळायचे, कोणते शॉट्स मारायचे, विकेट कशी आहे, हे कळते आणि जर मी मैदानात आहे, तर मी हे निश्चित करतो की मी जास्तीत जास्त वेळ बॅटिंग करावी. त्यामुळे माझी हीच मानसिकता आहे की जर मला चांगली सुरुवात मिळाली, तर मी त्या इनिंगला मोठं बनवतो, असं जयस्वाल म्हणाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : 'आमच्या बॉलर्सना एवढं मारू नको', ब्रायन लाराने ऑन कॅमेरा दिली यशस्वीला धमकी? Video आला समोर!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement