AUS vs IND 1st T20i : गौतम गंभीरने दिली कॅप्टन सूर्यकुमार यादवला क्लिन चीट, पहिल्या टी-ट्वेंटी मॅचआधी दिला मोलाचा सल्ला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Gautam Gambhir On Suryakumar Yadav : मागील महिन्यात सूर्यकुमार यादवने भारताला आशिया कप विजेतेपद मिळवून दिलं. मात्र, भारतीय टी-20 कर्णधाराची फलंदाजीची कामगिरी खराब होती.
India vs Australia1st T20i : आशिया कप जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्घ पाच टी-ट्वेंटी सामन्याची मालिका खेळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव हा खराब फॉर्ममधून जात आहे. आशिया कपमध्ये देखील सूर्याची बॅट चालली नाही. त्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. अशातच आता टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने क्लिन चीट दिली आहे. सूर्याच्या खराब फॉर्मची चिंता नाही, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.
सूर्यकुमार यादवला क्लिन चीट
मला सूर्याच्या फलंदाजीच्या फॉर्मची काळजी नाही कारण आम्ही आमच्या ड्रेसिंग रूममध्ये खूप आक्रमक मानसिकतेसाठी वचनबद्ध आहोत. जेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारची मानसिकता असते तेव्हा अपयशाला काही फरक पडत नाही, असं म्हणत गौतम गंभीरने कॅप्टन सूर्यकुमार यादवला क्लिन चीट दिली आहे. मागील महिन्यात सूर्यकुमार यादवने भारताला आशिया कप विजेतेपद मिळवून दिलं. मात्र, भारतीय टी-20 कर्णधाराची फलंदाजीची कामगिरी खराब होती, त्याने सात डावांमध्ये फक्त 72 धावा केल्या होत्या.
advertisement
सूर्याच्या फॉर्मची चिंता नाही
जिओहॉटस्टारशी बोलताना गंभीरने सूर्याच्या फॉर्मची चिंता नाही, असं म्हटलं आहे. टीकाकारांना उत्तर देण्यासाठी सूर्याला 30 चेंडूत 40 धावा करणं सोपं झालं असतं, पण त्याने असं केलं नाही. आम्ही सर्वांनी मिळून ठरवले की जर आपण आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला तर विजय आपला आहे. आमचं लक्ष वैयक्तिक कामगिरीवर नाही. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा सारख्या तरुण प्रतिभावान खेळाडूंनी जगाला ताकद दाखवून दिल्याचं देखील गंभीर म्हणाला आहे.
advertisement
अभिषेक शर्माचं कौतूक
अभिषेक शर्मा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि आशिया कपमध्ये त्याने आपली झलक दाखवली. जेव्हा सूर्याला त्याची लय मिळेल तेव्हा तो त्यानुसार जबाबदारी घेईल. बॅटर आमच्या आक्रमक शैलीत अपयशी ठरू शकतात, परंतु काही धावांपेक्षा प्रभाव जास्त महत्त्वाचा असतो, असं देखील गौतम गंभीर म्हणाला आहे. गंभीरने यावेळी टीम इंडियाच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवर समाधान देखील व्यक्त केलंय.
advertisement
सुर्यकुमार यादवचं कौतूक
कॅप्टन सूर्या निर्भय व्यक्ती आहे. त्याचं व्यक्तिमहत्त्व त्याच्या बॅटिंगमध्ये दिसतं. तुमचे व्यक्तिमत्त्व मैदानावर आणि ड्रेसिंग रूमध्ये दिसतं. त्यामुळे याचा संघाला चांगला फायदा होतो, असं गौतम गंभीर म्हणाला आहे. सूर्याने आपल्या कामगिरीने गेल्या दिड वर्षात सर्वांना प्रभावी केलं आहे, असं म्हणत गंभीरने सुर्यकुमार यादवचं कौतूक देखील केलंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 8:50 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AUS vs IND 1st T20i : गौतम गंभीरने दिली कॅप्टन सूर्यकुमार यादवला क्लिन चीट, पहिल्या टी-ट्वेंटी मॅचआधी दिला मोलाचा सल्ला!


