IND vs AUS : रोहित-विराटचं कमबॅक, बुमराहशिवाय टीम इंडिया मैदानात, पहिल्या वनडेमध्ये अशी असणार Playing XI!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळला जाणार आहे. 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिली वनडे सीरिज खेळणार आहे.
पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळला जाणार आहे. 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिली वनडे सीरिज खेळणार आहे. कर्णधार म्हणून शुभमन गिलची ही पहिली वनडे सीरिज असेल, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील 7 महिन्यांनंतर भारतीय टीममध्ये कमबॅक करत आहेत. ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामध्ये युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे, त्यामुळे पहिल्या वनडेमध्ये टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार?
टॉप ऑर्डर - रोहित शर्मा आणि शुभमन गिल बऱ्याच काळापासून वनडे सामन्यांमध्ये इनिंगची सुरुवात करत आहेत. गिल इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजपासून उत्कृष्ट कामगिरी करत आहे, इंग्लंडमध्ये त्याने 5 टेस्टमध्ये तब्बल 754 रन केल्या आहेत. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच वनडे सीरिजमध्येही अशीच कामगिरी करण्याची गिलची अपेक्षा असेल. तर रोहित शर्मा पुन्हा एकदा टीमला स्फोटक सुरूवात द्यायचा प्रयत्न करेल. विराट कोहली पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर टीमला मजबुती देईल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटने 54 पेक्षा जास्तच्या सरासरीने 218 रन केल्या होत्या.
advertisement
मिडल ऑर्डर - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वाधिक रन करणारा (243 रन) श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येऊ शकतो. श्रेयस अय्यर वनडे टीमचा उपकर्णधार देखील आहे. पाचव्या क्रमांकावर 56.48 च्या सरासरीने रन करणारा केएल राहुल खेळण्याची शक्यता आहे, याशिवाय राहुलकडे विकेट कीपिंगची जबाबदारीही असेल. स्पिन बॉलिंगसह सहाव्या क्रमांकावर अक्षर पटेल ऑलराऊंडर म्हणून खेळेल. अक्षरने यावर्षाच्या सुरूवातीला इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये 53 च्या सरासरीने रन केल्या. नितीश कुमार रेड्डीला फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून संधी मिळू शकते. चौथा फास्ट बॉलर म्हणूनही गिल त्याला वापरू शकतो.
advertisement
बॉलर- मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचं नेतृत्व करेल, त्याच्याशिवाय डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीपही ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तर तिसरा फास्ट बॉलर म्हणून प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. या सीरिजसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेट कीपर), अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षीत राणा/प्रसिद्ध कृष्णा
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 11:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : रोहित-विराटचं कमबॅक, बुमराहशिवाय टीम इंडिया मैदानात, पहिल्या वनडेमध्ये अशी असणार Playing XI!