IND vs AUS 3rd ODI : शुभमनने अखेर चूक सुधारली! कुलदीप यादवसह स्टार बॉलरची टीममध्ये एन्ट्री, पाहा दोन्ही संघाची Playing XI

Last Updated:

IND vs AUS 3rd ODI Playing XI : कर्णधार शुभमन गिलने आपल्या संघात दोन बदल केले असून, तो कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊन आला आहे.

IND vs AUS 3rd ODI Playing XI
IND vs AUS 3rd ODI Playing XI
India vs Australia 3rd ODI : सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd ODI) यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने पहिली मॅच 7 विकेट्सने आणि दुसरी मॅच 2 विकेट्सने जिंकून तीन मॅचच्या या सिरीजमध्ये 2-0 अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियावर क्लीन स्वीप होण्याचे संकट आहे. अशातच तिसऱ्या वनडे सामन्यात शुभमन गिलने पुन्हा टॉस हारला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

कुलदीप आणि प्रसिद्ध कृष्णा प्लेइंग इलेव्हनमध्ये

कर्णधार शुभमन गिलने आपल्या संघात दोन बदल केले असून, तो कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊन आला आहे. कोहलीसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अपयशी ठरल्यास त्याच्या वन-डे करिअरवर अनेक प्रश्नचिन्हे उभी राहू शकतात. कोहलीने या सिरीजमधील पहिल्या दोन्ही मॅचमध्ये एकही रन न करता (डक) आऊट होण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्यामुळे आजच्या सामन्यावर सर्वाचं लक्ष असणार आहे.
advertisement

मॅच आमच्यासाठी चांगली असेल - शुभमन

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, त्यालाही प्रथम बॉलिंग करायला आवडले असते. स्कोरबोर्डवर एक लक्ष्य निश्चित करून त्याचा पाठलाग करणे सोपे जाते. तो म्हणाला की, "मागच्या मॅचमध्ये आम्ही पुरेसे रन बनवले होते, पण आम्हाला मिळालेल्या संधी आम्ही साधू शकलो नाही. क्रिकेटच्या खेळात हे घडतं आणि तुम्हाला तुमच्या संधीचा फायदा घ्यावा लागतो. 40 व्या ओव्हरपर्यंत मॅच बरोबरीची होती, पण शेवटी त्यांनी चांगली कामगिरी केली. आशा आहे की ही मॅच आमच्यासाठी चांगली असेल." संघात दोन बदल करण्यात आले असून, कुलदीप आणि प्रसिद्ध हे अर्शदीप आणि रेड्डी यांच्या जागी संघात परतले आहेत.
advertisement
टीम इंडिया (Playing XI): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया (Playing XI): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कूपर कॉनॉली, मिचेल ओवेन, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS 3rd ODI : शुभमनने अखेर चूक सुधारली! कुलदीप यादवसह स्टार बॉलरची टीममध्ये एन्ट्री, पाहा दोन्ही संघाची Playing XI
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement