IND vs AUS 3rd T20 Pitch Report: गुवाहाटीची खेळपट्टी कशी आहे? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी रिपोर्ट कार्ड
- Published by:Rahul Punde
Last Updated:
IND vs AUS 3rd T20 Pitch Report: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा T20 सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
मुंबई, 27 नोव्हेंबर : वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला टीम इंडियाने सलग दोन टी 20 सामन्यात पाणी पाजलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा T20 सामना मंगळवारी (28 नोव्हेंबर) गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गुवाहाटीची खेळपट्टी कशी असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघ मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तिसरी टी-20 जिंकून मालिका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. उद्याच्या खेळपट्टी कशी आहे? नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम काय केले पाहिजे? या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या किती आहे.
गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमची विकेट साधारणपणे संथ आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येथे झालेल्या T20 सामन्यात एकूण 400 हून अधिक धावा झाल्या होत्या. आतापर्यंत या ठिकाणी 3 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यात सरासरी 118 धावा आल्या आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे एकदाच विजय मिळवला आहे तर पाठलाग करणाऱ्या संघानेही एकदा विजय मिळवला आहे. दव महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कर्णधाराला नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायला आवडेल.
advertisement
बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर 3 टी-20 सामने खेळले गेले
बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर 3 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने एक सामना जिंकला आहे तर पाहुण्या संघाने एक सामना जिंकला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. येथे संघाची सर्वोच्च धावसंख्या 3 विकेटवर 237 धावा होती, जी भारताने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती. या मैदानावरील किमान धावसंख्या 118 धावा आहे जी भारताने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती.
advertisement
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हवामान रिपोर्ट
हवामान वेबसाइट Accuweather नुसार, 28 नोव्हेंबर रोजी येथे खेळल्या जाणार्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सामन्याच्या दिवशी आकाश निरभ्र असण्याची शक्यता आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल. त्यानंतर कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सामना संपल्यावर रात्री साडेदहा वाजता तापमान 19 अंशांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2023 11:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS 3rd T20 Pitch Report: गुवाहाटीची खेळपट्टी कशी आहे? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी रिपोर्ट कार्ड