IND vs SA : LIVE मॅचमध्ये रोहितने काय WISH मागितली? रिषभ पंत होता साक्षीदार, VIDEO VIRAL
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रोहित शर्मा प्रेक्षकांनी भरलेल्या भरगच्च मैदानात इच्छा (WISH) मागताना दिसला आहे. या घटनेला रिषभ पंत साक्षीदार होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Rohit sharma Viral Video : रायपूरच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा वनडे सामना सूरू आहे. हा सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे.या सामन्या दरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा प्रेक्षकांनी भरलेल्या भरगच्च मैदानात इच्छा (WISH) मागताना दिसला आहे. या घटनेला रिषभ पंत साक्षीदार होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
लाईव्ह सामन्यातला रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा बाऊंन्ड्री लाईन उभा असल्याचे दिसत आहे.त्याच्या बाजूला रिषभ पंत उभा आहे. या दरम्यान रोहित शर्मा ही WISH मागतो.खरं तर लहाणपणी खूप जणांनी अशाप्रकारे WISH मागितल्या असतील.आपल्या डोळ्याचं एखाद केस तुटलं असेल तर ते हातावर ठेवून आपली जी इच्छा आहे ती मागायची त्याच्यानंतर फुंकर मारून तो केस उडवायचा. अशाप्रकारे आपण मागितलेली WISH पुर्ण होते, असा अनेकांचा समज आहे.
advertisement
This is actually so cute❤️😭pic.twitter.com/hx70Ou7dNu
— Chaithu 🇮🇳 (@ChaitRo45) December 3, 2025
अशाचप्रकारे रोहित शर्माने रिषभ पंतच्या सांगण्यावरुन हातावर केस ठेवून आपली इच्छा मांडली आणि फुंकर मारली होती.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे त्याने नेमकी काय WISH मागितली याची माहिती मिळू शकली नाही आहे.पण ती WISH पु्र्ण व्हावी असे अनेक चाहत्यांना नक्कीच वाटते.
advertisement
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):
क्विंटन डी कॉक (WK), एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (C), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.
भारत (प्लेइंग इलेव्हन):
view commentsयशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (w/c), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 8:07 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : LIVE मॅचमध्ये रोहितने काय WISH मागितली? रिषभ पंत होता साक्षीदार, VIDEO VIRAL


