IND VS SA FINAL : विजय जल्लोषात मुंबईच्या जेमीने कोचचीच फिरकी घेतली, "मी काय चणे खात...", VIDEO VIRAL
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
एका व्हिडिओत आता मुंबईच्या जेमीमा रॉड्रीग्जने कोचचीच फिरकी घेतली आहे.या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
India vs South Africa Final : टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचत वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला आहे. या विजयानंतर भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी मैदानात भन्नाट जल्लोष केला. याच जल्लोषाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.अशाच एका व्हिडिओत आता मुंबईच्या जेमीमा रॉड्रीग्जने कोचचीच फिरकी घेतली आहे.या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बीसीसीआयने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्टेडिमच्या अख्खं खाली झाल्याचे दिसतंय आणि स्टेडिअममधील काही अंशी लाईटही घालवण्यात आल्या होत्या.तरी देखील भारतीय खेळाडूंचा जल्लोष थांबला नव्हता. कारण लाईटस घालवल्यानंतर देखील भारतीय खेळाडूंचा एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
THE FINAL FIELDING MEDAL CEREMONY OF TEAM INDIA. 🇮🇳
pic.twitter.com/sTMCXFBGno
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2025
advertisement
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता टीम इंडीयाचे फिल्डींग कोच मुनीश बाली बेस्ट कॅच घेणाऱ्या खेळाडूचे नाव घोषित करतात.यावेळी आम्ही लीडरबोर्ड बनवत होतो.त्यात टॉप वर कोण असेल.स्मृती मानधना ऑन टॉप असे कोच म्हणताच जेमीमा रॉड्रीग्ज त्यांना रोखते.आणि मी आणि राधा काय चणे खात होतो का,अशी मजेशीर कमेंट ती करते. त्यामुळे एकप्रकारे ती कोचची फिरकी घेते. पुढे कोच म्हणतात स्मृतीने आठ कॅच घेतले, मैदानात तिने जबरदस्त फिल्डींग केली असे कौतुक देखील करतात.
advertisement
जेमीमाकडून अमनज्योतला मेडल
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता जेमीमा रॉड्रीक्स बोलते आहे. आपण नेहमीच खास क्षण आणि विशेष प्रसंगाबद्दल बोलत असतो. पण मैदानात असे अनेक क्षण येतात जे सगळ्यांचे आयुष्य बदलुन टाकतात. असाच क्षण आपल्यासाठी अमनज्योत घेऊन आली आहे,असे सांगत जेमिमा रॉड्रीक्सने अमनज्योतला बेस्ट फिल्डरचा मेडल दिला आहे.
खरं अमनज्योत फायनल सामन्यात बुलेटच्या वेगाने बॉल फेकत साऊथ आफ्रिकेची सलामीवीर ताजमिन ब्रिटसला रनआऊट केले होते.अशाप्रकारे तिने सलामी जोडी फोडली होती.त्यानंतर मैदानात लोरा वोल्वार्डने अख्खी मॅच फिरवली होती. ती साऊथ आफ्रिकेला वर्ल्ड कप जिंकून देईल असे वाटत होते. या दरम्यान अमनज्योतने बाऊंड्री लाईनवर उत्कृष्ट कॅच घेतला होता. या कॅचमुळेच अख्खी मॅच फिरली होती. त्यामुळे तु नुसता कॅच पकडला नाहीस तर वर्ल्ड कप पकडलास अशा शब्दात जेमीमाने तिचे शेवटी कौतुक केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 11:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND VS SA FINAL : विजय जल्लोषात मुंबईच्या जेमीने कोचचीच फिरकी घेतली, "मी काय चणे खात...", VIDEO VIRAL


