IND vs WI : 8 इनिंगमध्ये फक्त 147 रन, इंग्लंडनंतर भारतातही फेल, कॅप्टन गिल मित्रावर एवढा मेहरबान का?

Last Updated:

India vs West Indies कॅप्टन आणि कोचची कृपा असेल, तर तुमची कामगिरी कशीही असली, तरीही टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळते, असाच ट्रेंड आता सुरू झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

8 इनिंगमध्ये फक्त 147 रन, इंग्लंडनंतर भारतातही फेल, कॅप्टन गिल मित्रावर एवढा मेहरबान का?
8 इनिंगमध्ये फक्त 147 रन, इंग्लंडनंतर भारतातही फेल, कॅप्टन गिल मित्रावर एवढा मेहरबान का?
अहमदाबाद : कॅप्टन आणि कोचची कृपा असेल, तर तुमची कामगिरी कशीही असली, तरीही टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळते, असाच ट्रेंड आता सुरू झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. याचं ताजं उदाहरण आहे साई सुदर्शन. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये साई सुदर्शन फक्त 7 रनवर आऊट झाला. तर इंग्लंड दौऱ्यातल्या 7 इनिंगमध्ये साई सुदर्शनला 140 रन करता आले, तरीही तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शनला वारंवार संधी मिळत आहे. याआधी चेतेश्वर पुजारा आणि त्याआधी राहुल द्रविड या दिग्गजांनी टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर खिंड लढवली होती.
साई सुदर्शनला 8 इनिंगमध्ये एकदाही मोठी खेळी करता आलेली नाही, तरीही त्याला महत्त्वाच्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळत आहे. तर दुसरीकडे अनेक प्रतिभावान खेळाडू संधी मिळत नसल्यामुळे बेंचवरच बसून आहेत. साई सुदर्शनने आयपीएलमध्ये शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सकडून खेळताना धमाकेदार बॅटिंग केली. यानंतर त्याची भारताच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली, पण आयपीएलसारखी कामगिरी साई सुदर्शनला टेस्ट क्रिकेटमध्ये करता आली नाही.
advertisement

साई सुदर्शनच्या तंत्रात दोष?

मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि तामीळनाडूचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी इंग्लंड दौऱ्यात साई सुदर्शनची टीममध्ये निवड झाली, तेव्हाच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. 'साई सुदर्शन त्याच्या शरिरापासून लांब खेळतो, तसंच स्विंग होणाऱ्या बॉलसमोर खेळताना तो संघर्ष करतो, ज्यामुळे इंग्लंडमधल्या ड्युक्स बॉलने खेळताना साई सुदर्शन किती यशस्वी होईल, याबद्दल मला शंका आहे', असं सुलक्षण कुलकर्णी म्हणाले होते. साई सुदर्शनचं प्रथम श्रेणीचे रेकॉर्डही तितकं मजबूत नाही. साई सुदर्शनला टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी सरळ खेळावं लागेल, स्विंग होणाऱ्या बॉलसमोर तंत्र सुधारावं लागेल, तसंच काही शॉट मारण्यापासून स्वत:ला रोखावं लागेल, असा सल्लाही सुलक्षण कुलकर्णी यांनी दिला होता.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : 8 इनिंगमध्ये फक्त 147 रन, इंग्लंडनंतर भारतातही फेल, कॅप्टन गिल मित्रावर एवढा मेहरबान का?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement