VIDEO : केएल राहुल वेदनने कळवळला, नको त्या ठिकाणी बॉल लागतात पळत सुटला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहुलला नको त्या ठिकाणी बॉल लागला आहे. त्यामुळे तो वेदनेने मैदानात कळवळताना दिसला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
KL Rahul Video : वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला आता विजयासाठी फक्त 58 धावांची आवश्यकता आहे.या धावा सहज करून टीम इंडियाला दुसरा टेस्ट सामनाही जिंकता येणार आहे. पण हा विजय पाहण्यासाठी टीम इंडियाला उद्या पाचव्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. त्याआधी आज मोठी घटना घडली आहे. टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहुलला नको त्या ठिकाणी बॉल लागला आहे. त्यामुळे तो वेदनेने मैदानात कळवळताना दिसला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
खरं तर वेस्ट इंडिजने भारताने दिलेले फॉलोऑन पुर्ण करताच त्यांचा डाव 390 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवरी यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल मैदानात उतरले होते.यावेळी दोन्ही खेळाडू एकही विकेट न गमावता भारताला सामना जिंकून देतील असे वाटत होते. पण 8 धावा करताच यशस्वी जयस्वाल आऊट झाला होती.
advertisement
KL Rahul hurts his balls while playing 😭. Bro is giving his everything for the team, yet some people hate him. 🥲💔pic.twitter.com/vRGr2RlYh0
— Rahulified (@Rahulified_01) October 13, 2025
यशस्वी आऊट झाल्यानंतर साई सुदर्शन मैदानात उतरला होता.त्यानंतर तिसऱ्याच ओव्हरमध्ये केएल राहुल सोबत विचित्र घटना घडली. वेस्ट इंडिजच्या स्टील्सने टाकलेला बॉल थेट केएल राहुलच्या नको त्या ठिकाणी लागला. हा बॉल लागताच के एल राहुल बॅट फेकली आणि तो काही दुर पळत सुटला. त्यानंतर तो मैदानारवर बसला आपला हेल्मेट ग्लोव्हज काढलं. या दरम्यान तो प्रचंड वेदनेने असताना दिसत होता.
advertisement
त्यानंतर लगेचच फिजिओ मैदानात आले आणि त्याची तब्येतीची चौकशी केली.यानंतर काही वेळाने राहुलला बरे वाटले आणि त्याने फलंदाजी सूरूच ठेवली. त्याच्यानंतर चौथा दिवस संपेपर्यंत केएल राहुल 25 धावांवर आणि साई सुदर्शन 30 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाला जिंकण्यासाठी अजून 58 धावांची आवश्यकता आहे.
advertisement
दरम्यान उद्या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये भारत हे लक्ष्य गाठेल अशी शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडिया 2-0 ने मालिका सहज जिंकेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 8:47 PM IST