IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भडकली हरमनप्रीत कौर, टीम इंडियाच्या या खेळाडूंवर फोडलं खापर

Last Updated:

India vs Australia : सलामीच्या बॅटर्सनी उत्तम कामगिरी केली, पण मला वाटते की, शेवटचे 5 ओव्हर्स आम्हाला महागडे पडले, असं म्हणत हरमनप्रीतने (Harmanpreet Kaur Statement) डेथ बॉलर्सवर खापर फोडलं.

Harmanpreet Kaur First reaction on Loss Against Australia
Harmanpreet Kaur First reaction on Loss Against Australia
Harmanpreet Kaur Statement : आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला. अतितटीच्या या सामन्यात टीम इंडियाला 3 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. अशातच आता आयसीसी महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर (India vs Australia) भारतीय महिला संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने फलंदाजीत शेवटच्या टप्प्यात झालेल्या चुकांवर नाराजी व्यक्त केली. टॉस गमावल्यानंतर भारतीय बॅटर्सनी चांगली सुरुवात केली होती, पण फलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या या पिचवर आम्ही 30 ते 40 रन्स कमी केले, असं हरमनप्रीत कौर म्हणाली आहे.

शेवटचे 5 ओव्हर्स महागडे पडले - हरमनप्रीत कौर

शेवटच्या 6-7 ओव्हर्समध्ये लागोपाठ विकेट्स गेल्याने मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सलामीच्या बॅटर्सनी उत्तम कामगिरी केली, पण मला वाटते की, शेवटचे 5 ओव्हर्स आम्हाला महागडे पडले, असं म्हणत हरमनप्रीतने डेथ बॉलर्सवर खापर फोडलं. मागील तीन मॅचमध्ये मधल्या ओव्हर्समध्ये बॅटिंग झाली नाही, तेव्हा खालच्या फळीतील बॅटर्सनी जबाबदारी पार पाडली, असंही हरमनप्रीत म्हणाली आहे.
advertisement

पुढील दोन मॅचेस महत्त्वाचे

आज मात्र पहिले 40 ओव्हर्स चांगले होते, पण शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये आम्ही योजना व्यवस्थित अमलात आणू शकलो नाही. मॅचमध्ये अशा गोष्टी होतातच, तुम्ही प्रत्येक वेळी 100 टक्के देऊ शकत नाही, पण कमबॅक करणे खूप महत्त्वाचे आहे, असंही हरमनप्रीत म्हणाली. पुढील दोन मॅचेस महत्त्वाच्या आहेत आणि या मॅचमधूनही अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या आहेत. युवा बॉलर चरणीने खूप चांगली बॉलिंग केली. हीली बॅटिंग करत असतानाही तिने रन्स दिले नाहीत, असं म्हणत तिने चरणीचं कौतूक केलं आहे.
advertisement

टीम कॉम्बिनेशन बदलणार

दरम्यान, टीम कॉम्बिनेशनबद्दल आम्ही बसून चर्चा करू, पण दोन खराब मॅचमुळे फारसा फरक पडणार नाही, असं देखील हरमनप्रीतने स्पष्ट केलं. 331 रन्सच्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन कॅप्टन अलिसा हीलीने 107 बॉलमध्ये 142 रन्सची धडाकेबाज खेळी केली. हीलीच्या या 'तूफानी' बॅटिंगमुळे ऑस्ट्रेलियाने महिला वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा यशस्वी रन-चेस करत इतिहास रचला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भडकली हरमनप्रीत कौर, टीम इंडियाच्या या खेळाडूंवर फोडलं खापर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement