"कसोटीत टीम इंडियाला हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूची गरज", कुणी दाखवला शुभमन गिलला आरसा?

Last Updated:

Craig McMillan On Hardik pandya : झीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये खेळण्यासाठी टीम इंडियाला हार्दिक पांड्यासारख्या ऑलराऊंडरची गरज आहे, असं मत न्यूझीलंडचे माजी ऑलराऊंडर खेळाडू क्रेग मॅकमिलन यांनी व्यक्त केलंय.

Craig McMillan On Hardik pandya
Craig McMillan On Hardik pandya
India needed all rounder Like Hardik Pandya : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून शुभमन गिलने उत्तम कामगिरी केली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये 2-2 अशी मालिका बरोबरी साधली. गिलच्या या कामगिरीचे न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू खेळाडू क्रेग मॅकमिलन यांनी कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी कॅप्टन शुभमन गिल याला एक असा सल्ला दिला आहे, जो त्याला आगामी काळात कामी येईल.
advertisement

काय काय म्हणाले मॅकमिलन?

तो एक चांगला कर्णधार वाटतो. त्याची पहिलीच मालिका खूप कठीण होती. अशा दबावाखाली खेळताना त्याने काही चुका केल्या असतील, पण पहिल्याच मालिकेत अशा चुका अपेक्षित आहेत. अनुभवानुसार तो अधिक चांगला होईल. तो भारताचे भविष्य आहे, त्यामुळे भारत त्याच्यावर नक्कीच गुंतवणूक करेल. माझ्या मते, कर्णधार म्हणून त्याला त्याच्या संघाची खेळण्याची पद्धत आणि शैली समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement

हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूची गरज

आशियातील खेळपट्ट्यांवर रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर किंवा आर. अश्विनसारख्या फिरकीपटू अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता असते. पण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये जलदगती गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू लागतो. भारताला याच प्रकारच्या खेळाडूची, म्हणजे हार्दिक पांड्यासारख्या एका मीडियम पेस गोलंदाजी करणाऱ्या आणि खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची कसोटीत उणीव जाणवते, असं मॅकमिलन यांनी म्हटलं आहे.
advertisement

शुभमन गिलला महत्त्वाचा सल्ला

दरम्यान, न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी सध्या चेन्नईतील सुपर किंग्स अकादमीमध्ये सराव करत आहे. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या मॅकमिलन यांनी यावेळी बोलताना अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केलं. त्यावेळी त्याने शुभमन गिलला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
"कसोटीत टीम इंडियाला हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूची गरज", कुणी दाखवला शुभमन गिलला आरसा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement