VIDEO : LIVE सामन्यात तुफान राडा, डोळे दाखवले,शिविगाळ केली...मैदानात भयंकर ड्रामा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कुलदिप यादवने थेट अंपायरला डोळे दाखवले आहे आणि शिविगाळ केल्याचीही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Kuldeep Yadav Angry on Umpire : आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट गमावून 199 धावा ठोकल्या आहेत.त्यामुळे गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे आव्हान आहे.या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने चांगली सूरूवात केली आहे.या सामन्यात एक तुफान राडा झाला आहे.कुलदिप यादवने थेट अंपायरला डोळे दाखवले आहे आणि शिविगाळ केल्याचीही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
दिल्लीने दिलेल्या 200 धावांचा पाठलाग करताना गुजरातची सूरूवात चांगली झाली होती.यावेळी आठव्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवने गुजरातच्या साई सुदर्शनसाठी जोरदार अपील केली. त्यावेळी फिल्ड अंपायरने नॉट आऊटचा निर्णय दिला. आणि हा निकाल थेट थर्ड अंपायरकडे गेला.
Kuldeep Yadav Vs Umpire #DCvsGT pic.twitter.com/mhs69H8LX1
— SRIJAN 🇩🇪 (@mhatreszn) May 18, 2025
advertisement
यावेळी बॉल बॅटला स्पर्श न होताच पॅडवर आदळला आणि त्यामुळे दिल्लीने DRS घेतला. अल्ट्रा एजमध्ये बॅट अन् चेंडूचा संपर्क झाला नसल्याचे स्पष्ट होताच. बॉल ट्रॅकिंग चेक केलं गेलं त्यात चेंडू बरोबर मध्यभागी टप्पा पडल्याचे दिसले, परंतु तो वळण घेऊन डाव्या बाजूच्या स्टम्पवर निम्म्यावर आदळत असल्याचे दिसले आणि त्यामुळे तिसऱ्या अम्पायरने अंपायर कॉलचा निर्णय दिला. त्यामुळे साई सुदर्शन वाचला आणि हे पाहून कुलदीप चिडला.
advertisement
यानंतर कुलदीप यादवने मैदानावरील अम्पायरसोबत वाद घालताना दिसला आणि क्या यार... अशा वाक्याने त्याने सुरुवात केली.पुढे जाऊन त्याने अंपायरला शिविगाळ देखील केली.या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, समीर रिझवी, केएल राहुल (डब्ल्यू), अक्षर पटेल (क), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, कुलदीप यादव, टी नटराजन, मुस्तफिजुर रहमान
advertisement
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, अर्शद
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 18, 2025 10:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : LIVE सामन्यात तुफान राडा, डोळे दाखवले,शिविगाळ केली...मैदानात भयंकर ड्रामा