'CSK चे मालक फिक्सिंग करायचे, अंपायर्सला सांगून...', ललित मोदी यांचा खळबळजनक खुलासा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Lalit modi accused srinivasan of fixing : ललित मोदी यांनी चेन्नई सुपर किंग्ससंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि सचिव एन. श्रीनिवासन अंपायर्संना फिक्स करायचे, असा गंभीर आरोप ललित मोदींनी केलाय.
Lalit modi accused csk owner N Srinivasan : इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी बीसीसीआयचे माजी सचिव आणि चेन्नई सुपर किंग्जचे (CSK owner N Srinivasan) मालक एन श्रीनिवासन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एन श्रीनिवासन इंडियन प्रीमियर लीग मधील चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांमध्ये चेन्नईच्या पंचांची नियुक्ती करत होते, असा दावा केला आहे. एवढंच नाही तर आयपीएल लिलावात अँड्र्यू फ्लिंटॉफसाठी देखील फिक्सिंग केली गेली होती, असा क्रिडाविश्वात हादरवणारा खुलासा देखील ललित मोदी (Lalit modi) यांनी केला आहे.
राज शामानी या यूट्यूब चॅनलशी बोलताना ललित मोदी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. एन श्रीनिवासन यांना आयपीएलची कल्पना आवडली नव्हती आयपीएल चालेल असं त्याला वाटलं नव्हतं, पण जेव्हा ते सुरू झाले तेव्हा सर्वजण त्यात सामील झाले. एन श्रीनिवासन बोर्डाचे सदस्य आणि सचिवही होते, त्यामुळे ते माझे सर्वात मोठे विरोधक होते. जेव्हा मी त्याच्या विरोधात आवाज उठवला तेव्हा त्याने पंच फिक्सिंग अशा अनेक गोष्टी केल्या, असा आरोप ललित मोदी यांनी केला आहे.
advertisement
चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात एन श्रीनिवासन यांनी चेन्नईच्या पंचाची नियुक्ती केली होती आणि याला फिक्सिंग म्हणतात. म्हणून जेव्हा मी त्याला उघड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पूर्णपणे माझ्या विरोधात गेले. चेन्नईच्या संघाला अँड्र्यू फ्लिंटॉफ हा इंग्लंडचा खेळाडू हवा होता. मात्र, त्यांना लिलाव प्रक्रियेतून घेतल्याचं दाखवायचं होतं. त्यामुळे त्यांनी आधीच सर्वांना त्यावर बोली लावू नये, असं सांगितलं. मी त्यांना अँड्र्यू फ्लिंटॉफ दिला, हे मी मान्य करतो, असंही ललित मोदी म्हणाले.
advertisement
Lalit Modi accuses Srinivasan of UMPIRE FIXING in IPL:
1. Srini anyhow wanted Flintoff in CSK. He was BCCI Sec. We asked all other teams not to bid for him.
2. Srini changed the umpires. He appointed Chennai Umpires in the matches of Chennai Super Kings
: Raj Shamani YT pic.twitter.com/Z610hckBqD
— The Analyzer (News Updates ) (@Indian_Analyzer) November 27, 2024
advertisement
दरम्यान, जर अँड्र्यू फ्लिंटॉफ चेन्नईला दिला नसता तर ते आयपीएल होऊ देणार नव्हते. त्यामुळे मी सर्वांना सांगितलं अन् बोली न लावण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा आयपीएलसारखे कार्यक्रम राबवण्याची गरज असते, तेव्हा मी एकट्याने हे करून दाखवलंय, असंही ललित मोदी यांनी म्हटलं आहे. ललित मोदी यांच्या या वक्तव्यानंतर आयपीएलमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2024 9:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'CSK चे मालक फिक्सिंग करायचे, अंपायर्सला सांगून...', ललित मोदी यांचा खळबळजनक खुलासा