Pakistan : भारताविरुद्धच्या पराभवानंतर बावचळलं पाकिस्तान, 38 वर्षांच्या आफ्रिदीचं दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी सिलेक्शन!

Last Updated:

आशिया कप फायनलमध्ये भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर आता पाकिस्तानची टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर बावचळलं पाकिस्तान, 38 वर्षांच्या आफ्रिदीचं दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी सिलेक्शन!
भारताविरुद्धच्या पराभवानंतर बावचळलं पाकिस्तान, 38 वर्षांच्या आफ्रिदीचं दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी सिलेक्शन!
मुंबई : आशिया कप फायनलमध्ये भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर आता पाकिस्तानची टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. दोन टेस्ट मॅचच्या या सीरिजसाठी पाकिस्तानने 18 जणांच्या टीमची निवड केली आहे. पाकिस्तानच्या टीममध्ये 38 वर्षांच्या आसिफ आफ्रिदीची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे, याशिवाय फैसल अक्रम आणि रोहेल नझीर यांनाही पहिलीच संधी मिळाली आहे.
12 ऑक्टोबरपासून पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लाहोरमध्ये पहिली टेस्ट होणार आहे. या टेस्टआधी पीसीबी टीममध्ये छाटणी करेल. आसिफ आफ्रिदी आणि फैसल अक्रम पाकिस्तानच्या स्पिन बॉलिंगला मजबूत करतील. पाकिस्तानच्या टीममध्ये आधीच साजिद खान, नोमान अली आणि अबरार अहमद या स्पिनरचा समावेश आहे. या टीममध्ये 22 वर्षांचा फैसल लेग स्पिनर आहे, तर इतर सगळे ऑफ स्पिनर आहेत. फास्ट बॉलिंगची जबाबदारी शाहीन आफ्रिदी, हसन अली, खुर्रम शहजाद आणि आमीर जमाल यांच्यावर असेल. मोहम्मद अब्बास, नसीम शाह आणि मोहम्मद अली यांना पाकिस्तानच्या टीममधून वगळण्यात आलं आहे.
advertisement

बाबर-रिझवानचं कमबॅक

आशिया कपसाठी पाकिस्तानच्या टीममधून डच्चू मिळालेल्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानचं पाकिस्तानच्या टेस्ट टीममध्ये कमबॅक झालं आहे. मोहम्मद रिझवान हा विकेट कीपर म्हणून खेळेल, तर रोहेल हा बॅक-अप विकेट कीपर असेल. 2023 साली शेवटची टेस्ट खेळलेला इमाम-उल-हक टीममध्ये परतला आहे. इमाम-उल-हकने आशिया कपमध्ये संघर्ष केलेल्या सॅम अयुबची जागा घेतली आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत असलेल्या शाहीन आफ्रिदी, सलमान आघा, अबरार अहमद आणि हसन अली यांची टेस्ट टीमसाठीही निवड झाली आहे.
advertisement

पाकिस्तानची टेस्ट टीम

शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, आसिफ आफ्रिदी, बाबर आझम, फैसल अक्रम, हसन अली, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नोमान अली, रोहेल नझीर (विकेटकीपर), साजिद खान, सलमान अली आघा, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan : भारताविरुद्धच्या पराभवानंतर बावचळलं पाकिस्तान, 38 वर्षांच्या आफ्रिदीचं दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी सिलेक्शन!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement