निवृत्तीच्या वयात डेब्यू! पाकिस्तानने म्हाताऱ्या खेळाडूला मैदानात उतरवलं, कोण आहे खेळाडू ?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तान संघात बदलाचे वारे सूरू आहेत. असे असतानाच आता पाकिस्तानने एका म्हाताऱ्या खेळाडूला संघात स्थान दिले आहे.त्यामुळे या खेळाडूची क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
Pakistan vs South Africa : टीम इंडियाने काहीच महिन्यापुर्वी आशिया कपची ट्रॉफी जिंकली होती. या स्पर्धेत पाकिस्तान नव्या दमाच्या तरण्या खेळाडूंना संघात स्थान दिले होते. पण हे खेळाडू स्पर्धेत फारसे कामगिरी करू शकले नाही.त्यामुळे पाकिस्तान संघात बदलाचे वारे सूरू आहेत. असे असतानाच आता पाकिस्तानने एका म्हाताऱ्या खेळाडूला संघात स्थान दिले आहे.त्यामुळे या खेळाडूची क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
रावळपिंडीच्या मैदानावर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सूरू आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पाकिस्तान संघाने म्हाताऱ्या खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले होते. आसिफ आफ्रिदी असे त्या डावखुरा फिरकी गोलंदाजाचे नाव आहे. आसिफ आफ्रिदीने या सामन्यात कसोटी पदार्पण केले. आसिफ आफ्रिदीने निवृत्तीच्या वयात कसोटी पदार्पण केले आहे, त्यामुळे त्याची प्रचंड चर्चा रंगली आहे.
advertisement
वेगवान गोलंदाज हसन अलीच्या जागी आसिफ आफ्रिदीचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये करण्यात आला. वयाच्या 38 वर्षे आणि 299 दिवसांत कसोटी पदार्पण करणारा आसिफ पाकिस्तानच्या इतिहासातील तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. शाहीन शाह आफ्रिदीने आसिफला त्याची कसोटी पदार्पण कॅप दिली.
पेशावरच्या या 38 वर्षीय क्रिकेटपटूने आतापर्यंत 57 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, 95 डावांमध्ये 198 बळी घेतले आहेत. या काळात त्याने 13 वेळा एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.पाकिस्तानचा सर्वात वयस्कर कसोटी पदार्पण करणारा खेळाडू मीरान बख्श आहे. ज्याने 29 जानेवारी 1955 रोजी लाहोर येथे भारताविरुद्ध 47 वर्षे आणि 284 दिवस वयात पहिला कसोटी सामना खेळला.
advertisement
याशिवाय अमीर इलाहीने 16 ऑक्टोबर 1952 रोजी दिल्ली येथे भारताविरुद्ध 44 वर्षे आणि 45 दिवस वयाच्या पाकिस्तानकडून कसोटी पदार्पण केले. कसोटी पदार्पण करणारा आमिर हा दुसरा सर्वात वयस्कर पाकिस्तानी खेळाडू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 9:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
निवृत्तीच्या वयात डेब्यू! पाकिस्तानने म्हाताऱ्या खेळाडूला मैदानात उतरवलं, कोण आहे खेळाडू ?