Dewald Brevis वर बोलताना गडबड झाली अन् CSK अडचणीत, R Ashwin ने लगेच मारली पलटी, म्हणाला 'RCB ने देखील...'

Last Updated:

R Ashwin Breaks Silence On CSK statement : डेवाल्ड ब्रेविस याला चेन्नईमध्ये घेताना झालेल्या करार यावर बोलताना अश्विनने खळबळ उडवून दिली होती. त्यावर आता त्याने स्पष्टीकरण दिलंय.

R Ashwin On Dewald Brevis
R Ashwin On Dewald Brevis
R Ashwin On Dewald Brevis : चेन्नई सुपर किंग्जने (CSK) अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने याने स्वत:च्या फ्रेंचायझीवर खळबळजनक आरोप केले होते. डेवाल्ड ब्रेविस याला चेन्नईमध्ये घेताना झालेला करार यावर बोलताना अश्विनने खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जला अधिकृतरित्या स्टेटमेंट द्यावं लागलं. अशातच आता आर अश्विन याने आता पुढे येऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

चेन्नई सुपर किंग्जने दिलं अधिकृत स्टेटमेंट

चेन्नईला गुरजपनीत सिंगची जागा घेण्यासाठी एका खेळाडूची गरज होती आणि गेल्या मोसमात त्याची जागा ब्रेविसने घेतली होती. अश्विनच्या म्हणण्यानुसार, अनेक संघ या युवा दक्षिण आफ्रिकन फलंदाजाला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक होते, पण सुपर किंग्जने जास्त पैसे देऊन त्याला विकत घेतलं, असं अश्विन आधी म्हणाला होता. त्यावर चेन्नईने अधिकृतरित्या अश्विनचे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आता अश्विनने भलंमोठं स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement

आर अश्विन काय म्हणाला?

आपण अशा काळात जगत आहोत जिथे आपल्याला खऱ्या गोष्टींवरही स्पष्टीकरण द्यावं लागतं. अशा परिस्थितीत ते थोडं कठीण आहे. पण मी त्याबद्दल बोलणार नाही. इथं कोणाचीही चूक नाही. या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे कारण अनेकांना शंका होती. मुद्दा असा आहे की खेळाडूची चूक नाही, फ्रँचायझीची चूक नाही आणि कदाचित प्रशासकीय मंडळाचीही चूक नाही, असं अश्विन म्हणाला.
advertisement
पण सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे की जर एखाद्या फ्रँचायझीला खेळाडूची गरज असेल तर फ्रँचायझी त्या खेळाडूशी किंवा खेळाडूच्या एजंटशी बोलते आणि बीसीसीआयला सांगते, पहा, आमचा हा खेळाडू जखमी आहे, आम्हाला दुसऱ्या खेळाडूची गरज आहे. प्रकरण इथेच संपतं, असं अश्विन म्हणाला.
आयपीएल किंवा ज्यांना मान्यता द्यायची असते, ते मान्यता देतात आणि खेळाडू येऊन खेळतो. जर त्यात काही चूक झाली असती तर तो खेळाडू फ्रँचायझीसाठी खेळला नसता. हे ब्रेव्हिसबद्दल नाही, ते सहसा असेच असते. आणखी एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की व्हिडिओमध्ये माझा उद्देश ब्रेव्हिस किती चांगली फलंदाजी करत आहे हे सांगणे होता, असं अश्विनने म्हटलं आहे.
advertisement
केवळ चेन्नई सुपर किंग्जनेच बदलीचा पर्याय निवडला नाही, तर इतर अनेक संघ देखील आहेत. आरसीबीने यापूर्वी ख्रिस गेलला घेतले होते आणि तो सुपरस्टार बनला. जखमी खेळाडूंची बदली ही आयपीएलची एक सामान्य बाब आहे आणि त्यातही नियमांमधील लवचिकता, तुम्ही ते कसे वापरता, एका मर्यादेत, तुम्ही ते वापरू शकता, असं अश्विनने म्हटलं आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Dewald Brevis वर बोलताना गडबड झाली अन् CSK अडचणीत, R Ashwin ने लगेच मारली पलटी, म्हणाला 'RCB ने देखील...'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement