रवींद्र जडेजाने रचला इतिहास, विराट-रोहितच्या निवृत्तीनंतर आली मोठी बातमी समोर!

Last Updated:

Ravindra Jadeja Huge Milestone : काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यांनतर एक मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. जडेजाच्या या विक्रमाची बरोबरीत कोणताही भारतीय किंवा परदेशी खेळाडू नाही.

News18
News18
काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या तडकाफडकी निवृत्तीच्या घोषणेने संघात खळबळ उडाली.
यानंतर दिग्गज खेळाडू रवींद्र जडेजा हा देखील निवृत्ती घेईल अश्या चर्चा रंगू लागल्या. याच दरम्यान एक चांगली बातमी समोर येत आहे. रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. जडेजा हा कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने हे स्थान सर्वात जास्त काळ टिकवून ठेवले आहे.

advertisement
आयसीसीच्या पुरुषांच्या कसोटी क्रमवारीच्या ताज्या यादीनुसार भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने मोठा इतिहास रचला आहे. 2024 च्या आयसीसी कसोटी संघात स्थान मिळवणाऱ्या जडेजाने कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक काळ नंबर वन अष्टपैलू राहण्याचा विक्रम रचला आहे. तो सलग 1151दिवस कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन अष्टपैलू राहिला आहे.

आतापर्यंत, जगभरातील कसोटी क्रिकेटच्या इतिहासात, कोणताही खेळाडू इतक्या काळासाठी नंबर वन अष्टपैलू खेळाडू राहिलेला नाही. रवींद्र जडेजा नंबर वन झाल्यापासून 1152 दिवस झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देखील एक पोस्ट शेअर करून रवींद्र जडेजाचे अभिनंदन केले आहे.

रवींद्र जडेजा टीम इंडियासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये दमदार कामगिरी करतो. जडेजाने आतापर्यंत 80 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये जडेजाने 34.74 च्या सरासरीने 3.370 धावा केल्या आहेत. या धावा करताना रवींद्र जडेजाने 4 शतके आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत.

रवींद्र जडेजाने या 80 सामन्यांमध्ये 323 विकेट्स घेतल्या आहेत. 2019 मध्ये 200 बळी घेऊन जडेजाने एक विक्रम रचला.

तो 200 बळी घेणारा सर्वात जलद डावखुरा गोलंदाज ठरला. 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जडेजा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही होता.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रवींद्र जडेजाने रचला इतिहास, विराट-रोहितच्या निवृत्तीनंतर आली मोठी बातमी समोर!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement