रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 च्या वर्ल्ड कपला खेळणार की नाही? Shubman Gill ने दिली मोठी हिंट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shubman Gill On Rohit-Virat : रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे जो अनुभव आणि कौशल्य आहे, ते खूप कमी खेळाडूंकडे असतं, असं शुभमन गिल म्हणाला आहे.
Shubman Gill Press Conference : आगामी 2027 ला होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील का? हा प्रश्न सध्या प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात घोंगावत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून टाकण्यात आली होती. अशातच आता रोहित आणि विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेतील, अशी शक्यता वर्तविली जात असताना आता कॅप्टन शुभमन गिल याने मोठं वक्तव्य केलं आहे.
विराट अन् रोहितबद्दल काय म्हणाला शुभमन गिल?
रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे जो अनुभव आणि कौशल्य आहे, ते खूप कमी खेळाडूंकडे असतं. त्यांच्या दोघांनी जितके सामने खेळले आहेत, तितके भारताला जिंकण्यास इतर खेळाडूंना मेहनत घ्यावी लागते. अशा प्रकारचे कौशल्य, गुणवत्ता आणि अनुभव असणं, मला वाटते की जगात खूप कमी खेळाडूंकडे आहे, असं शुभमन गिल म्हणाला. त्यानंतर त्याने एकाच वाक्यात मनातली गोष्ट सांगितली.
advertisement
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी...
दोन्ही खेळाडूंकडे असलेली गुणवत्ता आणि अनुभव हे 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी खूप चांगलं आहेत, असं म्हणत शुभमन गिल याने कोट्यावधी क्रिकेट फॅन्सला गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे कॅप्टन शुभमन गिल रोहित आणि विराटला संघात घेण्यासाठी इच्छुक आहे, असं स्पष्ट झालंय.
दरम्यान, रोहित भाईकडून मला वारशाने मिळालेले अनेक गुण आहेत. तो जो शांत स्वभाव दाखवतो आणि संघात त्याची मैत्री आहे, ही अशी गोष्ट आहे जी मी आकांक्षा बाळगतो आणि घेऊ इच्छितो. हे असे गुण आहेत जे मी त्याच्याकडून घेऊ इच्छितो, असंही शुभमन गिल म्हणाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 2:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 च्या वर्ल्ड कपला खेळणार की नाही? Shubman Gill ने दिली मोठी हिंट!