Rohit Sharma : पुन्हा एकदा 19 नोव्हेंबर... रोहित शर्माचा परत हार्टब्रेक, वनडे सीरिजआधी आली वाईट बातमी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
19 नोव्हेंबर 2023 हा दिवस कोणताही भारतीय क्रिकेट चाहता कधीही विसरू शकत नाही. वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचा धक्का दिला.
मुंबई : 19 नोव्हेंबर 2023 हा दिवस कोणताही भारतीय क्रिकेट चाहता कधीही विसरू शकत नाही. वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचा धक्का दिला, या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचे मैदानातच अश्रू अनावर झाले. टीम इंडियाच्या खेळाडूंसोबतच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं. असंख्य भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी 19 नोव्हेंबर हा काळा दिवस वाटतो.
पुन्हा एकदा 19 नोव्हेंबरलाच रोहित शर्माचा हार्टब्रेक झाला आहे. आयसीसीने 19 नोव्हेंबरच्या दिवशी केलेल्या एका घोषणेमुळे रोहितसोबतच असंख्य भारतीय क्रिकेट चाहतेही नाराज झाले आहेत. रोहित शर्मा आता वनडे क्रिकेटमध्ये नंबर वन बॅटर राहिलेला नाही. न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलने रोहित शर्माची नंबर वनची खूर्ची काढून घेतली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये धमाकेदार बॅटिंग केल्यानंतर डॅरेल मिचेल वनडे क्रिकेटचा नवा नंबर वन बॅटर बनला आहे, याचसोबत त्याने इतिहासही घडवला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाच्या मदतीने रोहित वनडेमध्ये नंबर वन बॅटर बनला होता.
advertisement
डॅरेल मिचेलने वनडे क्रिकेटच्या बॅटिंग क्रमवारीमध्ये दोन रँकिंगची उडी घेऊन थेट पहिला क्रमांक गाठला आहे. डॅरेल मिचेलचे सध्या 782 रेटिंग पॉईंट्स आहेत, तर रोहित शर्माचे 781 रेटिंग पॉईंट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा इब्राहिम झादरान आहे. डॅरेल मिचेलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 119 रनची खेळी केली, ज्यामुळे न्यूझीलंडचा 7 रननी विजय झाला.
advertisement
मिचेलने इतिहास घडवला
डॅरेल मिचेल न्यूझीलंडचा वनडे क्रिकेटमधला दुसरा नंबर वन बॅटर बनला आहे. याआधी 1979 साली न्यूझीलंडचे महान खेळाडू ग्लेन टर्नर वनडे क्रिकेटमध्ये नंबर वन बॅटर बनले होते. मार्टिन क्रो, एन्ड्र्यू जॉन्स, रोजर ट्वोस, नॅथन एस्टल, केन विलियमसन, मार्टिन गप्तील आणि रॉस टेलर हे न्यूझीलंडचे बॅटर आयसीसी क्रमवारीत टॉप-5 मध्ये पोहोचले, पण त्यांना नंबर वन होता आलं नाही. 46 वर्षांनंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडचा बॅटर वनडे क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : पुन्हा एकदा 19 नोव्हेंबर... रोहित शर्माचा परत हार्टब्रेक, वनडे सीरिजआधी आली वाईट बातमी!


