Rohit Sharma : अजित आगरकरची अट अखेर रोहित मान्य करणार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर करणार मोठी घोषणा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
19 ऑक्टोबरपासून टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरूवात होत आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आधी 3 वनडे मॅचची सीरिज आणि मग 5 टी-20 मॅच खेळणार आहे.
मुंबई : 19 ऑक्टोबरपासून टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरूवात होत आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आधी 3 वनडे मॅचची सीरिज आणि मग 5 टी-20 मॅच खेळणार आहे. वनडे सीरिजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कमबॅक झालं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर तब्बल 7 महिन्यांनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताकडून खेळणार आहेत. या दोघांनीही मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर यावर्षी इंग्लंड दौऱ्याआधी दोघांनी टेस्ट क्रिकेटलाही अलविदा केलं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली आहे. रोहितऐवजी शुभमन गिलला भारताच्या वनडे टीमचा कर्णधार करण्यात आलं आहे. गिलला कर्णधार केल्यामुळे रोहित आणि विराट 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
रोहित मान्य करणार आगरकरची अट
भारतीय टीम फार वनडे क्रिकेट खेळत नसल्यामुळे तसंच रोहित टी-20 आणि टेस्टमधून निवृत्त झालेला असल्यामुळे त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी व्हावं, अशी निवड समिती प्रमुख अजित आगरकरची इच्छा होती. भारतामध्ये नुकत्याच झालेल्या इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए मधल्या वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा खेळेल, अशी शक्यताही वर्तवली गेली होती, पण रोहित या सीरिजमध्ये खेळला नाही. पण आता रोहित अजित आगरकरची अट मान्य करणार असल्याची शक्यता आहे.
advertisement
रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याची शक्यता आहे. 24 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीला सुरूवात होत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकूण 6 राऊंडच्या मॅच होणार आहेत, यातल्या कमीत कमी 3 राऊंडमध्ये रोहित शर्मा सहभागी होऊ शकतो, असं वृत्त समोर आलं आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा भारतीय चाहत्यांना विजय हजारे ट्रॉफी खेळताना दिसू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 11:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : अजित आगरकरची अट अखेर रोहित मान्य करणार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर करणार मोठी घोषणा!