तेंडुलकरांच्या घरात येणार सुनबाई? क्रिकेटच्या देवानेच दिली कबुली, म्हणाला 'नव्या आयुष्यात अर्जुनला...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sachin Tedndulkar On Arjun Engagement : काही दिवसांपूर्वी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा साखरपुडा झाल्याची बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती. अखेर सचिनने स्वतः उत्तर देऊन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
Sachin Tedndulkar Break silence : क्रिकेटच्या देव म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाच्या (Arjun Tendulkar Engagement) साखरपुड्याची अनेक दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अखेर सोमवारी थांबली. सोशल मीडियावरच्या 'आस्क मी एनीथिंग' सेशनमध्ये सचिनने स्वतः या गोष्टीला दुजोरा दिला आहे. अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला असून, त्यांचे कुटुंब या नव्या टप्प्यासाठी खूप उत्साहित असल्याचे सचिन तेंडूलकरने (Sachin Tedndulkar) सांगितलं.
सचिनने दिली आनंदाची बातमी
काही दिवसांपूर्वी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक (Saaniya chandhok) यांचा साखरपुडा झाल्याची बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती. मात्र, तेंडुलकर किंवा चंडोक कुटुंबातील कोणीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सचिनने स्वतः उत्तर देऊन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
advertisement
आस्क मी एनीथिंग
सोमवारी झालेल्या 'आस्क मी एनीथिंग' सेशनमध्ये एका चाहत्याने सचिनला थेट प्रश्न विचारला, "खरंच अर्जुनचा साखरपुडा झाला आहे का?" यावर सचिनने होकारार्थी उत्तर देत सांगितले की, "हो, त्याचा साखरपुडा झाला आहे आणि त्याच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यासाठी आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत."
Sachin Tendulkar responds to question on Arjun Tendulkar’s engagement pic.twitter.com/zREd7QH0Oc
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) August 25, 2025
advertisement
उद्योजक रवी घई यांची नात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा 13 ऑगस्ट रोजी एका खासगी कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमात केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. सानिया ही प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे. अर्जुन सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) तो मुंबई इंडियन्सचा खेळाडूआहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 7:34 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
तेंडुलकरांच्या घरात येणार सुनबाई? क्रिकेटच्या देवानेच दिली कबुली, म्हणाला 'नव्या आयुष्यात अर्जुनला...'


