Sports: आजवर फक्त 65 भारतीयांना जमली 'ही' गोष्ट, पंढरपूरच्या 16 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं!
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
पंढरपूरच्या सहिष्णू जाधव या तरूण जलतरण पटूने इतिहास रचला आहे. त्याने दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार केली आहे...
डोव्हर, इंग्लंड: सहिष्णू जाधव या पंढरपूरच्या 16 वर्षीय मुलाने दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा भीम पराक्रम केला आहे. बऱ्याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य असतो, पण सलग दुसऱ्या वर्षी पोहून सहिष्णू ह्याला अपवाद ठरला आहे. हा धाडसी जलतरणपटू 29 जुलै 2024 रोजी पुन्हा इंग्लिश खाडी पोहून पार करून गेला.
सलग दुसरा पराक्रम:
गेल्या वर्षी, सहिष्णूने सहा व्यक्तींच्या टीमसोबत 16 तासांच्या संघर्षानंतर इंग्रजी खाडी पार केली होती. यावर्षी त्याने तीन जणांच्या टीमसोबत मागच्या वर्षीपेक्षा कमी वेळेत म्हणजे १५ तास ८ मिनिटांत हे अंतर पार केले. सहिष्णू हा दोन वेळा इंग्रजी खाडी पार करणारा सर्वात तरुण भारतीय असून आजवरच्या इतिहासात केवळ 65 भारतीयांनी इंग्लिश खाडी पोहली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीने भारतीयांची मान उंचावली आहे आणि त्याचबरोबर असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा देखील दिली आहे.
advertisement
'यशाचा मोठा आनंद...'
या आपल्या यशावर बोलताना सहिष्णू म्हणतो की, "मी अशा असंख्य भारतीय व्यक्तींविषयी वाचन केल्यानंतर पटलेली आणि कळलेली गोष्ट म्हणजे त्यांनी अशक्य वाटणाऱ्या अडथळ्यांवर मात करूनच विजय मिळवलेला आहे. पोहताना येणाऱ्या अडथळ्यांवर त्यांचा आदर्श समोर ठेवत मी मात केली. मी माझ्या प्रशिक्षणाने माझ्यात विकसित झालेली शिस्त, आणि भारतीय योग्यांप्रमाणे आपल्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून केलेलं समर्पण ह्या गोष्टींना समोर ठेऊन पोहत राहिलो , मला पुढे नेत राहिलो . भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान आणि जगाला आपण भारतीय काय करू शकतो हे दाखवण्याची मिळालेली संधी, याने मला माझे सर्वस्व देण्यास प्रवृत्त केले." असं म्हणत आपल्याला मिळालेलं यश कुटुंब आणि सर्व पाठिराख्यांचं आहे, असं सहिष्णू जाधव म्हणाला.
advertisement
सहिष्णूची वाटचाल थोडक्यात
सहिष्णूचा जलतरणातील प्रवास मागील वर्षी म्हणजे त्याच्या वयाच्या 15 व्या वर्षी सुरु झाला. इंग्लिश खाडी, वाहते प्रवाहआणि अनिश्चित हवामान हे त्याच्या प्रसिद्ध वैशिष्ट्यांपैकी आहेत, जलतरणपटूंसाठी ही एक आव्हानात्मक परिक्षा असते. प्रशिक्षण आणि अभ्यासाचे संतुलन त्याने नेहमीचं ठेवले. टीमचे जलतरण 29 जुलै रोजी पहाटे सुरु झाले, आणि प्रवाह, तापमान बदल, आणि थकव्याच्या अडचणींना तोंड देत त्यांनी हा प्रवास संध्याकाळी पूर्ण केला. आणि जवळपास 15 तासानंतर त्याने विक्रमाला गवसणी घातली.
advertisement
अनेकांना मिळेल प्रेरणा: सहिष्णूच्या यशस्वी इंग्रजी खाडी रिले जलतरणाची बातमी भारतभर झपाट्याने पसरली, सोशल मीडिया प्रशंसेच्या संदेशांनी भरून गेली. लोकांनी त्याने अडचणींच्या प्रवासात दाखवलेल्या दृढ निश्चयाचे कौतुक केले. "शेवटी, खाडी पोहून पार करणे हे क्रिकेट सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्यापेक्षा मला चांगले वाटले. पण अधिक महत्त्वाचे म्हणजे, याने मला शिकवले की आपल्या मर्यादा अनेकदा केवळ भ्रम असतात आणि चिकाटीने आपण आपल्या विचारांपेक्षा पुढे जाऊ शकतो." हे सहिष्णूचे प्रेरणादायी शब्द आहेत.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 31, 2024 4:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sports: आजवर फक्त 65 भारतीयांना जमली 'ही' गोष्ट, पंढरपूरच्या 16 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं!