IND vs PAK : खुळ्या सलमानने दाखवली पाकिस्तानची दुखती नस, सूर्या तिथंच वार करणार! काय म्हणाला कॅप्टन?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Pakistan :पाकिस्तानचा धुरंधर मानला जाणारा सॅम आयुब पहिल्या सामन्यात तर फुसका बार निघाला. सलमान अली आगाने स्वत: कबुल केलं की पाकिस्तानची बॅटिंग लाईन अप कमकुवत आहे.
Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित मॅच 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. आशिया कपमधील ग्रुप ए मधील हा एक महत्त्वाचा सामना आहे. अशातच आता पाकिस्तानने पहिल्या सामन्यात ओमानचा पराभव केला अन् पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा (Salman Ali Agha) याने भारताला चॅलेंज दिलंय. पण बोलता बोलता सलमान असं काही बोलून गेला की पाकिस्तानची कमकुवत बाजू संपूर्ण जगासमोर आली.
टीम इंडियाला चॅलेंज
"ज्या प्रकारे आम्हाला सुरुवाती मिळाली होती, त्यावरून आम्ही 180 धावा करायला पाहिजे होत्या, पण क्रिकेटमध्ये असं होतच असतंय. आम्ही सध्या खूप चांगला क्रिकेट खेळत आहोत, आम्ही ट्राय-सिरीज जिंकली आणि इथंही सहज विजय मिळवला. जर आम्ही आमच्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली, तर आम्ही कोणत्याही टीमला हरवण्यासाठी पुरेसे सक्षम आहोत.", असं म्हणत सलमान आगाने टीम इंडियाला चॅलेंज दिलं आहे. पण त्यावेळी त्याने बॅटिंग लाईन अपवर टीका देखील केली.
advertisement
बॅटिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज
सामना जिंकल्यानंतर आगा म्हणाला, "मी बॉलिंग युनिटवर खूप आनंदी आहे. पण बॅटिंगमध्ये आम्हाला अजूनही सुधारणा करायची आहे. पण आमची बॉलिंग खूपच चांगली झाली, आमच्याकडे तीन वेगळे स्पिनर आहेत, आणि त्यांच्यासोबत आयुबसहित आमच्याकडे 4-5 चांगले पर्याय आहेत, जे दुबई आणि अबू धाबीमध्ये मॅच खेळताना आवश्यक आहेत. त्यामुळे आम्ही आगामी सामन्यात चांगली कामगिरी करू, असं सलमान आगा म्हणाला.
advertisement
पाकिस्तानचे फुसके बॉम्ब
दरम्यान, सलमान अली आगाने स्वत: कबुल केलं की पाकिस्तानची बॅटिंग लाईन अप कमकुवत आहे. त्यामुळे आता सुर्यकुमार देखील तिथंच वार करणार अन् पाकिस्तानचा पराभव निश्चित करणार आहे. पाकिस्तानचा धुरंधर मानला जाणारा सॅम आयुब पहिल्या सामन्यात तर फुसका बार निघाला. आणखी किती पाकिस्तानची फुसके बॉम्ब असतील हे येत्या 14 तारखेला स्पष्ट होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 9:36 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : खुळ्या सलमानने दाखवली पाकिस्तानची दुखती नस, सूर्या तिथंच वार करणार! काय म्हणाला कॅप्टन?