कठीण काळात भाऊ सोबत, लग्न तुटल्याच्या 24 तासात स्मृती इज बॅक, श्रवणच्या Photo ने लक्ष वेधलं!

Last Updated:

टीम इंडियाची स्टार ओपनर आणि उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. स्मृतीचं लग्न 23 नोव्हेंबरला संगीतकार पलाश मुच्छलसोबत होणार होतं.

कठीण काळात भाऊ सोबत, लग्न तुटल्याच्या 24 तासात स्मृती इज बॅक, श्रवणच्या Photo ने लक्ष वेधलं!
कठीण काळात भाऊ सोबत, लग्न तुटल्याच्या 24 तासात स्मृती इज बॅक, श्रवणच्या Photo ने लक्ष वेधलं!
मुंबई : टीम इंडियाची स्टार ओपनर आणि उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. स्मृतीचं लग्न 23 नोव्हेंबरला संगीतकार पलाश मुच्छलसोबत होणार होतं, पण लग्न मोडल्याचं स्मृतीने जाहीर केलं आहे. बऱ्याच कालावधीपासून स्मृती आणि पलाश एकमेकांना डेट करत होते, पण अचानक असं काय झालं? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
स्मृती मानधनाने 7 डिसेंबरला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात तिने पलाशसोबतचं लग्न तुटल्याचं सांगितलं. तसंच या कठीण काळात वैयक्तिक आयुष्याचा सन्मान ठेवा, असं आवाहनही स्मृतीने केलं. लग्न तुटल्याची घोषणा केल्यानंतर 24 तासामध्येच स्मृतीने हातात बॅट घेतली आहे. लग्न मोडल्याचं दु:ख मनात ठेवून स्मृती मैदानात उतरली आहे.
21 डिसेंबरपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात 5 मॅचची टी-20 सीरिज सुरू होणार आहे. स्मृती या सीरिजच्या तयारीला लागली आहे. स्मृतीचा भाऊ श्रवण मानधनाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर हार्ट इमोजी लावण्यात आला आहे. फोटोमध्ये स्मृती ट्रेनिंगचे कपडे घालून तसंच पायावर पॅड आणि डोक्यावर हेल्मेट लावून बॅटिंग करताना दिसत आहे. स्मृतीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी स्मृतीच्या या डेडिकेशनचं कौतुक केलं आहे.
advertisement

स्मृती शेवटची मैदानात कधी उतरली?

स्मृती मानधाना भारताकडून शेवटचा सामना वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय झाला होता. आता 21 ते 30 डिसेंबरदरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 सीरिज होणार आहे. या सीरिजचे सामने विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथे होतील. यानंतर स्मृती 9 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महिला प्रीमीयर लीगमध्ये आरसीबीचं नेतृत्व करताना दिसेल. महिला प्रीमीयर लीगचे सामने नवी मुंबईमध्ये होणार आहेत.
advertisement
स्मृती मानधनाने 7 डिसेंबरला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शे्र करून लग्न तुटल्याचं जाहीर केलं होतं. 'लग्न रद्द करण्यात आलं आहे, दोन्ही कुटुंबांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर ठेवा. क्रिकेटबद्दलची माझी प्रतिबद्धता कायम आहे. भारताचं प्रतिनिधीत्व करणं ही माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे', असं स्मृती तिच्या पोस्टमध्ये म्हणाली. यानंतर काही वेळातच पलाशनेही लग्न रद्द झाल्याची पोस्ट केली. 'या नात्याला पुढे न्यायचा निर्णय घेतला आहे, हा माझ्या आयुष्यातला कठीण काळ आहे. माझ्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे', असं पलाश म्हणाला.
advertisement

23 नोव्हेंबरला काय झालं?

23 नोव्हेंबरला स्मृती आणि पलाश यांचं सांगलीमध्ये लग्न होणार होतं, पण अचानक लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका लागल्यामुळे लग्न पुढे ढकलल्याचं दोन्ही कुटुंबांकडून सांगितलं गेलं, यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. अखेर स्मृतीने सोशल मीडियावर पोस्ट करून सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
कठीण काळात भाऊ सोबत, लग्न तुटल्याच्या 24 तासात स्मृती इज बॅक, श्रवणच्या Photo ने लक्ष वेधलं!
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement