हरत होते तरी माज उतरत नव्हता, बवुमाला खेळताना म्हणाले तुम्ही अजूनही.... ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचं धक्कादायक वर्तन
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
साऊथ आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर होती, त्यावेळेस ऑस्ट्रेलियाने रडीचा डाव खेळायला सूरूवात केली होती. टेम्बा बावुमा आणि एडन मार्करमला चोकर्स नावाने चिवडत होती असा खळबळजनक खुलासा विजयानंतर साऊथ आफ्रिकेच्या कर्णधाराने केला आहे.
WTC Final : बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत साऊथ आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशीप जिंकली आहे. या सामन्यात ज्यावेळेस साऊथ आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर होती, त्यावेळेस ऑस्ट्रेलियाने रडीचा डाव खेळायला सूरूवात केली होती. टेम्बा बावुमा आणि एडन मार्करमला चोकर्स नावाने चिवडत होती असा खळबळजनक खुलासा विजयानंतर साऊथ आफ्रिकेच्या कर्णधाराने केला आहे.
फायनल जिंकल्यानंतर टेम्बा बावुमा म्हणाला की, ज्यावेळेस आम्हाला 60 धावांची गरज होती,त्यावेळेस त्यांनी आम्हाला चोकर्सच्या नावाने चिडवायला सूरूवात केली होती. त्यांच्यातल्या एका खेळाडूने तर यांना 60 धावांच्या आत ऑल आऊट करू, असे शब्द मी स्पष्टपणे ऐकले होते,असा खुलासा बावुमाने केला होता.
बावुमा पुढे म्हणाला, मार्करामच्या शब्दांनी मला लक्ष्यापासून विचलित होऊ दिले नाही. कारण प्रत्येक षटकानंतर एडेन क्रीजवर राहण्यास सांगत होता.आपल्याला खंबीर राहावे लागेल. आपण त्यांना परत येण्याची कोणतीही संधी देऊ नये,असे मला समजावत होता.
advertisement
तसेच गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे थोडे वेगळे झाले आहे. ते मैदानावर पूर्वीसारखे बोलत नाहीत. ते अजूनही त्यांच्या देहबोलीतून आक्रमक होण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे कौशल्य आहे, पण ते पूर्वीसारखे मैदानावर बकवास बोलत नाहीत,असे देखील बावुमाने सांगितले.
चोकर्स का म्हणतात?
आफ्रिकन संघाने 1998 मध्ये फक्त एकदाच ICC जेतेपद जिंकले होते. त्यानंतर,अनेकदा ते जेतेपदापर्यतं पोहोचले पण विजयाने त्यांना हुलकावणी दिली होती. 1998 पासून संघाने 12 क्वार्टर फायनल,2 सेमीफायनल आणि 1 अंतिम सामना ICC स्पर्धांमध्ये खेळला. या काळात त्यांना प्रत्येक सामन्यात अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांना चोकर म्हटले जाऊ लागले. पण आता त्यांनी WTC पुरस्कार जिंकून हा मिथक मोडला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 15, 2025 9:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हरत होते तरी माज उतरत नव्हता, बवुमाला खेळताना म्हणाले तुम्ही अजूनही.... ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचं धक्कादायक वर्तन