यशस्वी जयस्वाल देणार राजस्थान रॉयल्सला धोका? कोणत्या संघात घेणार एंट्री? सोशल मीडिया पोस्टने खळबळ
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
IPL 2025 RR : आयपीएलची चुरस चांगलीच रंगली आहे. 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहेत या संघात प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. अशातच काही संघ आधीच या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यातलाच एक संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स.
IPL 2025 RR : आयपीएलची चुरस चांगलीच रंगली आहे. 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहेत या संघात प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. अशातच काही संघ आधीच या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यातलाच एक संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स. चेन्नई सुपर किंग्जनंतर राजस्थान रॉयल्स हा संघ आयपीएल 2025 मधून बाहेर पडला. अशातच एक खळबळजनक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्सची एक्सिट
आयपीएल 2025 चा हंगाम राजस्थान रॉयल्ससाठी चांगला राहिला नाही. राजस्थानची सुरुवात चांगली राहिली नाही आणि या हंगामातून त्यांना लवकर बाहेर पडावे लागले. या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने मात्र कमी वेळात खुप प्रसिद्धी कमावाली. आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक आणि तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी खेळली. पण खेळडूंच्या उत्तम कामगिरीनंतर देखील संघ या हंगामातून बाहेर पडला.
advertisement
यशस्वी जयस्वालच्या पोस्टने खळबळ
खरंतर, या मोठ्या बातमीचा प्रसार यशस्वी जयस्वालने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सुरू झाला, त्यानंतर एकच खळबळ उडाली. इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे आभार मानले. त्याने लिहिले, राजस्थान रॉयल्सचे सर्व गोष्टींसाठी आभार. आम्हाला हवा होता तसा हंगाम नव्हता, पण प्रवासाबद्दल धन्यवाद.
advertisement
यशस्वी जैस्वाल केकेआरमध्ये जाणार का?
यशस्वी जयस्वालची ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. जयस्वाल राजस्थान रॉयल्स सोडणार का, असा अंदाज सर्वजण लावत आहेत. काही वापरकर्त्यांच्या मते, यशस्वी ट्रेड विंडो अंतर्गत राजस्थानहून केकेआरला जाऊ शकतो का? पण मोठा प्रश्न असा आहे की या संपूर्ण प्रकरणामागील सत्य काय आहे? हे खरोखरच खरे आहे की दुसरे काही कारण आहे?
advertisement
या खळबळजनक बातमीमागील सत्य काय आहे?
ते म्हणतात की बऱ्याचदा जे खरे दिसते ते खरे नसते. यशस्वी जयस्वालशी संबंधित या खळबळजनक बातमीमागील सत्य देखील असेच काहीसे आहे. खरं तर, यशस्वी जयस्वाल यांनी नंतर इंस्टाग्रामवर केलेली पोस्ट दुरुस्त केली. त्याची पोस्ट, जी व्हायरल होत आहे आणि ज्यामुळे तो राजस्थान रॉयल्स सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे, त्या पोस्टमध्ये आणि नंतर संपादित केलेल्या पोस्टमध्ये फक्त एका शब्दाचा फरक आहे, ज्यामुळे संपूर्ण अर्थ बदलतो. यशस्वीच्या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये तो प्रवासानंतर 'टुगेदर' लिहायला विसरला, ज्याचा अर्थ एकत्र आहे. म्हणून त्याने राजस्थान रॉयल्ससोबत प्रवास करण्याबद्दल आणि ती फ्रँचायझी न सोडण्याबद्दल बोलले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 22, 2025 12:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
यशस्वी जयस्वाल देणार राजस्थान रॉयल्सला धोका? कोणत्या संघात घेणार एंट्री? सोशल मीडिया पोस्टने खळबळ