इंग्लंडचा ट्रिपल धमाका, World Cup पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!

Last Updated:

महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने लागोपाठ तिसरा विजय मिळवला आहे, त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर झाला आहे. तसंच हरमनप्रीतच्या टीम इंडियासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

इंग्लंडचा ट्रिपल धमाका, World Cup पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!
इंग्लंडचा ट्रिपल धमाका, World Cup पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!
कोलंबो : इंग्लंडची कर्णधार नताली सायव्हर ब्रंटचं शतक आणि डावखुरी स्पिनर सोफी एक्लेस्टोनच्या शानदार कामगिरीमुळे महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने श्रीलंकेचा 89 रननी पराभव केला आहे. नताली सायव्हर ब्रंटने 117 रनची खेळी केली, महिला वर्ल्ड कपमधलं नतालीचं हे पाचवं शतक होतं. आतापर्यंत दुसऱ्या कोणत्याच महिला क्रिकेटपटूला वनडे वर्ल्ड कपमध्ये एवढी शतकं करता आलेली नाहीत. आतापर्यंत चार वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या इंग्लंडचा यंदाच्या वर्ल्ड कपमधला 3 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. याआधी इंग्लंडने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा पराभव केला होता.

श्रीलंकेचा 164 रनवर ऑलआऊट

श्रीलंकेचा या सामन्यात 45.5 ओव्हरमध्ये 164 रनवर ऑलआऊट झाला. एक्लेस्टोनने 10 ओव्हरमध्ये फक्त 17 रन देऊन 4 विकेट घेतल्या. तर नतालीने 5 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. या ऑलराऊंड कामगिरीबद्दल नतालीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

इंग्लंडच्या 253 रन

या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 253 रन केल्या. नतालीच्या 117 रनशिवाय तमसिन ब्यूमोंटनेही 32 रनची खेळी केली. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने 3 विकेट घेतल्या.
advertisement

पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंड अव्वल

लागोपाठ 3 सामन्यांमध्ये 3 विजय मिळवून इंग्लंड वर्ल्ड कप पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने 3 पैकी 2 सामने जिंकले असून त्यांचा एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 5 पॉईंट्स आहेत. 3 सामन्यात 2 विजय आणि एका पराभवासह भारतीय टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेचेही 4 पॉईंट्स आहेत, पण चांगल्या नेट रनरेटमुळे भारतीय टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
advertisement

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचं आव्हान

दरम्यान रविवारी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. विशाखापट्टणममध्ये दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चूक भारताला महागात पडू शकते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
इंग्लंडचा ट्रिपल धमाका, World Cup पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement