फक्त कॉलिंगच्या ग्राहकांसाठी BSNL चा भारी प्लॅन, मिळेल दीर्घ व्हॅलिडिटी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार व्हॉईस कॉलिंग प्लॅन ऑफर केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दीर्घ व्हॅलिडिटीचा लाभ मिळतो. यामध्ये कंपनी फ्री SMS देखील देते.
BSNL Rs 439 Recharge Plan: देशात कोट्यवधी मोबाईल यूझर्स आहेत जे त्यांचा फोन फक्त कॉलिंगसाठी वापरतात. यामध्ये फीचर फोन यूझर्सचाही समावेश आहे. सरकारी कंपनी बीएसएनएल अशा ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर देत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्स अनलिमिटेड कॉलिंगसह दीर्घ व्हॅलिडिटीचा लाभ घेऊ शकतात. त्यात मोबाईल डेटा उपलब्ध नाही. या प्लॅनविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
BSNL चा 439 रुपयांचा प्लॅन
BSNL आपल्या 439 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देते. यासह, यूझर्सना तीन महिन्यांची म्हणजे 90 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याशिवाय कंपनी या प्लॅनसह 300 फ्री एसएमएस देखील देते. जे लोक आपला नंबर फक्त कॉलिंगसाठी वापरतात त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरू शकतो. तसेच फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे. जे ग्राहक त्यांच्या फोनवर डेटा वापरू शकत नाहीत, त्यामुळे आता त्यांना डेटासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत.
advertisement
दीर्घ व्हॅलिडिटी देखील दिलासा
आजकाल महागड्या रिचार्जमुळे लोकांच्या खिशावरचा भार वाढत आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या ग्राहकाला जास्त पैसे न देता आपला नंबर अॅक्टिव्ह ठेवायचा असेल, तर 90 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला हा प्लॅन त्याच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
advertisement
इतर कंपन्यांनाही आणावे लागतील व्हॉइस ओनली प्लॅन
BSNLप्रमाणेच इतर कंपन्यांनाही लवकरच व्हॉईस प्लॅन लॉन्च करावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी शुल्क आकारले जाईल. गेल्या महिन्यात दूरसंचार नियामक ट्रायने सर्व कंपन्यांना केवळ व्हॉइस प्लॅन लागू करण्याचे आदेश दिले होते. आता कंपन्या त्यांच्या प्लॅनमध्ये मोबाइल डेटा देऊन अतिरिक्त पैसे घेऊ शकणार नाहीत. याचा परिणाम देशातील सुमारे 15 कोटी 2G यूझर्सवर होईल, जे त्यांच्या प्लॅनमधील डेटासाठी पैसे देऊ इच्छित नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 13, 2025 11:57 AM IST