हर्षद मेहताकडे होतं 'या' आलिशान कार्सचं कलेक्शन
- Published by:News18 Lokmat
- trending desk
Last Updated:
आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली आणि सर्वांत महागडी लेक्सस एलएस 400 ही कार त्याच्याकडे होती. याशिवाय अनेक कार्स त्याच्या गॅरेजमध्ये होत्या. हर्षद मेहता नेमक्या कोणत्या कार्स वापरायचा आणि त्या कार्सची फीचर्स कोणती होती, ते सविस्तर जाणून घेऊ या.
मुंबई, 12 ऑगस्ट : 90च्या दशकात शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताचा मोठा दबदबा होता. त्याला मार्केट किंग मानलं जायचं. हर्षद मेहताची लाइफस्टाइल उंची होती. त्याच्याकडे अनेक जबरदस्त कार्सचं कलेक्शन होतं. त्यापैकी काही कार्स तर भारतात लाँचदेखील झालेल्या नव्हत्या. आज ज्याप्रमाणे कारमध्ये एअरबॅगसह प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश असतो, त्या काळी त्याच्याकडे अशा फीचर्सच्या कार्सचं मोठं कलेक्शन होतं. त्याच्याकडे 15 ते 20 कार्स होत्या असं सांगितलं जातं. त्या काळी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली आणि सर्वांत महागडी लेक्सस एलएस 400 ही कार त्याच्याकडे होती. याशिवाय अनेक कार्स त्याच्या गॅरेजमध्ये होत्या. हर्षद मेहता नेमक्या कोणत्या कार्स वापरायचा आणि त्या कार्सची फीचर्स कोणती होती, ते सविस्तर जाणून घेऊ या. `प्रभात खबर`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
1990च्या दशकाच्या सुरुवातीला हर्षद मेहताकडे 15-20 कार्स होत्या. लेक्सस एलएस 400 या कारसाठी 45 लाख रुपये खर्च करणं त्याच्यासाठी सहज शक्य होते. या कारमध्ये स्वयंचलित टेलिस्कोपिक आणि टिल्ट स्टिअरिंग व्हील, एसआरएस एअरबॅग, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सीट बेल्ट आणि एक इलेक्ट्रोक्रोमिक रिव्ह्यू मिरर अशी फीचर्स होती. ही कार प्रीमियम लक्झरी सेदानपैकी एक होती. यात 4000 सीसीचं इंजिन होतं. हे इंजिन चार स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला सपोर्ट करणारं होतं. ताशी 0 ते 100 किलोमीटर वेग घेण्यासाठी या कारला केवळ 8.5 सेकंदं लागायची. या कारचा टॉप स्पीड ताशी 250 किलोमीटर होता.
advertisement
Vehicle Policy : मोकाट सांड कारला धडकला तर विमा कंपनी भरपाई देते का? कोणत्या प्रकणात मिळतो क्लेम?
त्या काळी खूप लोकप्रिय असलेली मर्सिडीज बेंझ W126 ही कार देखील हर्षद मेहताच्या कलेक्शनमध्ये होती. ही कार सर्वसामान्य नागरिकांसह जागतिक नेते आणि सेलेब्रिटीजमध्ये खूप लोकप्रिय होती. कारण ती इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, सेफ्टी आणि मेकॅनिकल अशा सर्वच दृष्टिकोनांतून सर्वोत्तम होती.
advertisement
हर्षद मेहताकडे अॅकॉर्ड होंडा ही इम्पोर्टेड कार होती. या कारमध्ये 2.2 लिटर इनलाइन चार सिलिंडर इंजिन होतं. त्यातून 125 हॉर्सपॉवर शक्ती तयार व्हायची. मेहताच्या गॅरेजमध्ये फियाट पद्मिनी ही त्याकाळची सर्वांत लोकप्रिय कारदेखील होती.ही कुटुंबासाठी बनवलेली कार म्हणून ओळखली जायची. प्रिमियर पद्मिनीमध्ये 1.1 लिटर चार सिलिंडर पेट्रोल इंजिन होतं. हे इंजिन 4800 rpm वर 47bh आणि 3000 rpmवर 71 Nm टॉर्क जनरेट करायचं.
advertisement
अॅम्बेसेडर ही कारदेखील हर्षद मेहताच्या कलेक्शनचा एक भाग होती. त्या काळी ही देशातली सर्वांत लोकप्रिय कार मानली जायची. देशाला हिंदुस्तान अॅम्बेसिडरची वेगळी माहिती देण्याची गरज नाही. या कारमध्ये 1.5 लिटर बीएसी बी-सीरिजचं इंजिन होतं. ते 37 हॉर्सपॉवर शक्ती जनरेट करायचं. कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन होतं. हे इंजिन 50 एचपी आणि 100 एनएम टॉर्क जनरेट करत असे.
advertisement
हर्षद मेहताच्या कलेक्शनमध्ये एचएम कॉन्टेसा ही कारही समाविष्ट होती. त्या काळी ही कार खूप लोकप्रिय होती. ती उत्तम रीतीने उत्पादित केलेली कार होती. मजबूत, रुबाबदार आणि आरामदायी अशी ही कार होती. 1990मध्ये हिंदुस्तान मोटर्सच्या या कारची किंमत 5.90 लाख रुपये होती.
हर्षद मेहताची लाइफस्टाइल उंची होती. कधी-कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वाधिक आवडतात, त्याच गोष्टी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. हर्षद मेहताला उतरती कळा लागण्यासाठी लेक्सस एलएस 400 या कारने महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळी टाइम्स ऑफ इंडियाच्या स्तंभलेखिका सुचेता दलाल यांनी भारतीय स्टेट बँकेच्या मुख्यालयाबाहेर ही कार पाहिली. भारतात अद्याप लाँच न झालेली ही कार एक स्टॉकब्रोकर कशी खरेदी करू शकतो, असा प्रश्न त्यांना पडला. तिथूनच हर्षद मेहताचा वाईट काळ सुरू झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2023 11:01 PM IST