AC चा गॅस संपलाय की नाही? असं करा चेक, मॅकेनिकला पैसे द्यायची गरजच नाही
- Published by:Mohini Vaishnav
- trending desk
Last Updated:
एसीत किती गॅस प्रेशर असायला पाहिजे? याबद्दल जाणून घेण्याआधी एसीत किती प्रकारचे गॅस असतात ते पाहूया.
मुंबई : कडक उन्हाळा सुरू झालाय. वाढत्या उन्हामुळे आता घरांमध्ये कूलर, एसी सुरू होऊ लागले आहेत. बऱ्याच ठिकाणी आता एसीची साफसफाई होत असेल जेणेकरून उन्हाळ्यात तो वापरता येईल. काही वेळा लोक एसीच्या मेकॅनिकला घरी बोलावतात जेणेकरून एसीचा गॅस संपला नाही ना हे कळेल. या कामासाठी मेकॅनिकला पैसे द्यावे लागतात. पण तुम्ही ते घरीच तपासू शकता, ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील. गॅस चार्जिंगसाठी दोन-तीन हजारांचा खर्च येतो, पण तुम्ही घरीच गॅस संपलाय किंवा लिक होतोय का हे जाणून घेऊ शकता.
स्वतः एसी कसा चेक करायचा
एसीमधील गॅस लिक होतोय की नाही हे घरीच तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी कूलिंग कंडेन्सर चेक करावा लागेल. एसी सुरू करा आणि मग कूलिंग कॉईल तपासा. जर एसीच्या कूलिंग कॉईलमध्ये बर्फ तयार झाला नसेल तर त्याचा अर्थ एसीचा गॅस लिक झालेला नाही.
AC मध्ये गॅसचं प्रेशर
एसीत किती गॅस प्रेशर असायला पाहिजे? याबद्दल जाणून घेण्याआधी एसीत किती प्रकारचे गॅस असतात ते पाहूया. एसीमध्ये R32 व R410 असे दोन गॅस असतात. आजकाल R32 गॅस जास्त वापरला जातो. हा गॅस ओझोन लेअरसाठी धोकादायक नाही. हा गॅस लिक झाल्यास पर्यावरणाचं नुकसान होत नाही. जर तुमच्या एसीतील गॅस लीक होतोय असं मेकॅनिकने सांगितलं असेल तर तुम्ही गेजच्या माध्यमातून तपासू शकता. गेज कम्प्रेसर भिंतीत लावलेला असतो आणि याद्वारे गॅसचे प्रेशर चेक करता येतं. इन्व्हर्टर एसीत गॅसचे प्रेशर 150 नॉर्मल असते. तुमच्या एसीत इतकं प्रेशर असेल तर गॅस रिफील करायची गरज नाही. तसेच नॉर्मल एसीमध्ये गॅस प्रेशर 60 ते 80 दरम्यान असेल तर हे ठीक आहे.
advertisement
एसीमध्ये गॅस नाही ते कसं कळेल?
- एसीमुळे रुम नीट थंड होत नसेल तर गॅस कमी झालाय किंवा संपलाय.
- एसीमध्ये बबलिंगचा आवाज येत असेल तर गॅस कमी झालाय किंवा संपलाय असं समजून जा.
- एसी रूममधील आर्द्रता कमी करतो. पण एसी नीट कूलिंग देत नसेल,आर्द्रता कमी होत नसेल तर गॅस कमी झालाय असं समजून घ्या.
advertisement
- एसीतील कम्प्रेसरच्या माध्यमातून गॅस कमी झालाय की संपलाय हे कळतं. कम्प्रेसर रुम टेम्प्रेचरनुसार ऑन-ऑफ होतं, पण ते आधीच्या तुलनेत ऑन-ऑफ व्हायला वेळ घेत असेल तर गॅस संपलाय असं समजून घ्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 04, 2024 2:26 PM IST