VIDEO : ऑस्ट्रेलिया जिंकली खरी पण भारताच्या दोन वाघिणींनी नाकात दम आणला, अख्ख्या स्टेडियमने 'तो' क्षण पाहिला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर हा सामना जरी ऑस्ट्रेलियाने जिंकला असला तरी भारताच्या दोन वाघीणींनी त्यांना भयंकर टक्कर दिली होती. ही टक्कर इतकी भयानक होती की ऑस्ट्रेलियाच्या नाकात दम आणला होता.
India w vs Australia w : आयसीसी वुमेन्स वर्ल्डकपच्या आजच्या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 3 विकेट राखून पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने 330 धावांचे आव्हान पुर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. कारण महिला क्रिकेटच्या इतिहासात इतक्या धावांचा पाठलाग कुणालाच करता आला नव्हता. खरं तर हा सामना जरी ऑस्ट्रेलियाने जिंकला असला तरी भारताच्या दोन वाघीणींनी त्यांना भयंकर टक्कर दिली होती. ही टक्कर इतकी भयानक होती की ऑस्ट्रेलियाच्या नाकात दम आणला होता.
advertisement
खरं तर ऑस्ट्रेलियाने चांगली सूरूवात केली होती. पण या दरम्यान 27 व्या ओव्हरमध्ये बेथ मुनीने जेमीमा रॉड्रीक्सच्या दिशेने बॉल मारला होता. हा बॉल तिच्यापासून खूप दूर होता. पण तिने हवेत झेप घेत खतरनाक झेल घेतला होता. त्यामुळे बेथ मुनीने 4 धावांवर स्वस्तात बाद केले होते. जेमीचा हा कॅच खूपच खतरनाक होता. या कॅचमुळे भारताला पुन्हा सामन्यात पतरण्याची आशा निर्माण झाली होती.
advertisement
🚨Caught Of the Tournament 🚨
Deepti Sharma to Mooney, THATS OUT!! Caught!!#INDWvsAUSW #INDWvAUSW pic.twitter.com/OlnJpXhquz
— Voice of Asia 🎤 (@Asianewss) October 12, 2025
जमीनीतून खोदून कॅच घेतली
ऑस्ट्रेलियाची एलिसा हिलीने 142 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळी दरम्यान तिने 3 षटकार आणि 21 चौकार लगावले होते. एलिसा हिली ज्या लयीत खेळत होती ते पाहता ती ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देऊन श्वास घेईल असे वाटत होते. पण या दरम्यान श्री चरणीच्या बॉलवर ती फसली आणि आऊट होऊन बसली.
advertisement
एलिसा हिलीने श्री चरणीच्या बॉलवर खेळत असताना तिचा बॅटीला कड लागला आणि बॉल थेट बँकवर्ड पॉईंटवर गेला होता.यावेळी तिथे उभ्या असलेल्या स्नेह राणाने एका हाताने जमीनीत खोदून कॅच घेतली. अशाप्रकारे स्नेह राणाने एका जबरदस्त खेळाडूची कॅच घेऊन तिला खतरनाक निरोप दिला आहे.
advertisement
दरम्यान जेमीमा आणि स्नेह राणाने घेतलेल्या या दोन कॅच खूपच भयानक होत्या. या कॅचमुळे सामना पलटेल असे वाटत होते पण अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य गाठत 3 विकेटस राखून सामना जिंकला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 11:21 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : ऑस्ट्रेलिया जिंकली खरी पण भारताच्या दोन वाघिणींनी नाकात दम आणला, अख्ख्या स्टेडियमने 'तो' क्षण पाहिला