UPI Transaction कसं डिलिट करायचं? 'या' ट्रिकने कळणार नाही तुम्ही कोणाला पैसे पाठवलेत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
डिजिटल पेमेंट करताना तुमचे सर्व व्यवहार (Transactions) ऍपच्या ट्रांजेक्शन हिस्ट्रीमध्ये सेव्ह होत असतात. म्हणजेच कोणीही तुमच्या फोनमधील ऍप उघडले तर त्याला तुम्ही कोणाला, कधी आणि किती पैसे पाठवले हे कळू शकते.
मुंबई : आजच्या काळात बहुतांश लोक ऑनलाइन खरेदीपासून ते मित्र-परिवाराला पैसे पाठवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी UPI पेमेंट ऍप्सचा वापर करतात. PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या ऍप्समुळे व्यवहार करणे अगदी काही सेकंदात शक्य होते. यामुळे सुट्टे पैशांची ही झंटझंट संपते. पण एक प्रश्न अनेकदा पडतो की आपण केलेले व्यवहार दुसऱ्यांना दिसू नयेत यासाठी काही उपाय आहे का?
डिजिटल पेमेंट करताना तुमचे सर्व व्यवहार (Transactions) ऍपच्या ट्रांजेक्शन हिस्ट्रीमध्ये सेव्ह होत असतात. म्हणजेच कोणीही तुमच्या फोनमधील ऍप उघडले तर त्याला तुम्ही कोणाला, कधी आणि किती पैसे पाठवले हे कळू शकते. काही वेळा आपल्याला असे वाटते की ही माहिती खासगी राहिली पाहिजे. तर मग ही हिस्ट्री डिलीट किंवा लपवता येते का?
advertisement
यासाठी एक खास ट्रिक आहे, चला ते कसं लपवायचं जाणून घेऊ.
Paytm मध्ये ट्रांजेक्शन हिस्ट्री कशी लपवाल?
Paytm मध्ये ट्रांजेक्शन पूर्णपणे डिलीट करण्याचा थेट पर्याय नसतो. कारण हे रेकॉर्ड बँक आणि RBI च्या नियमांनुसार सुरक्षित ठेवले जातात. पण तुम्ही ऍपमधील हिस्ट्री लपवू (Hide) शकता.
स्टेप-बाय-स्टेप पद्धत:
-तुमच्या फोनमध्ये Paytm ऍप उघडा.
advertisement
-होम पेजवरील Balance and History या पर्यायावर क्लिक करा.
-संपूर्ण ट्रांजेक्शन हिस्ट्री दिसेल.
-ज्या व्यवहाराला लपवायचे आहे त्यावर डावीकडे (Left swipe) करा.
-Hide हा पर्याय निवडा आणि कन्फर्म करा.
असे केल्यावर तो व्यवहार तुमच्या हिस्ट्रीतून आणि त्या कॉन्टॅक्टच्या हिस्ट्रीतून देखील गायब होईल.
PhonePe आणि Google Pay मध्ये काय करायचं?
PhonePe आणि Google Pay मध्ये ट्रांजेक्शन थेट लपवण्याचा किंवा डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध नाही. पण Google Pay साठी Google My Activity वरून ट्रांजेक्शन डिलीट करता येते.
advertisement
कसे कराल?
-Google Pay ऍप उघडा आणि उजवीकडील प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
-Settings → Privacy and Setting → Data and Personalization या मार्गाने Google Account मध्ये क्लिक करा
-येथे तुम्हाला Google My Activity पेज मिळेल. तिथे गुगल अकाउंट लॉग इन असेल तर संपूर्ण ट्रांजेक्शन हिस्ट्री दिसेल. जर लॉग इन नसेल तर तुम्हाला आधी ते लॉग इन करावं लागेल.
advertisement
ज्या व्यवहाराला डिलीट करायचे आहे त्याच्या शेजारील X चिन्हावर क्लिक करा. Delete वर क्लिक करा.
शेवटचे महत्त्वाचे लक्षात ठेवा
Paytm मध्ये फक्त लपवणे (Hide) शक्य आहे, पूर्ण डिलीट होत नाही नाही.
Google Pay मध्ये व्यवहार डिलीट करता येतो, पण तोही Google My Activity वरून करावा लागतो.
PhonePe मध्ये सध्या असा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
UPI Transaction कसं डिलिट करायचं? 'या' ट्रिकने कळणार नाही तुम्ही कोणाला पैसे पाठवलेत


