SIM Card Rules:PMO चा नवा आदेश! सिम कार्डच्या नियमांमध्ये झाले बदल

Last Updated:

PMO ने नवीन मोबाईल कनेक्शनसाठी नवीन आदेश जारी केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने दूरसंचार विभागाला (DoT) काय नियम सांगितलेय चला जाणून घेऊया.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : PMO ने सिम कार्ड विक्रेत्यांसाठी नवीन आदेश जारी केला आहे. पीएमओने दूरसंचार विभागाला एक नवीन सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये आधार कार्ड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनशिवाय सिम कार्डची विक्री थांबविण्यास सांगितले आहे. सर्व नवीन कनेक्शनसाठी आधार बेस्ड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आली आहे. गुन्हेगारांनी बनावट कागदपत्रांद्वारे नवीन मोबाईल कनेक्शन खरेदी करून नंतर त्यांच्यामार्फत फसवणूक केल्याने शासनाचा हा आदेश जारी करण्यात आला आहे.
सिम कार्डचा नवीन नियम
सिमकार्डच्या नियमांनुसार, नवीन मोबाइल कनेक्शन घेण्यासाठी आधार कार्डाव्यतिरिक्त कोणताही सरकारी आयडी वापरला जाऊ शकतो, ज्यामध्ये मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादींचा समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेला हा आदेश सिमकार्ड विक्रीचे नियम अधिक कडक करण्यासाठी जारी करण्यात आला आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार, सिम कार्ड किरकोळ विक्रेते बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनशिवाय सिम कार्ड विकू शकणार नाहीत.
advertisement
दूरसंचार क्षेत्राच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर पीएमओने हे निर्देश दिले आहेत. DoT कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत (LEAs) AI आधारित साधनांचा वापर करून गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी काम करत आहे. आधार बेस्ड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनशिवाय कोणतेही सिम कार्ड जारी केले जाणार नाही, असे दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आले आहे. असे केल्याने मोबाईलचा वापर फसवणुकीसाठी होणार नाही.
advertisement
सायबर गुन्ह्यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत दूरसंचार क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करून एकच उपकरण अनेक सिमकार्डसाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले. या सिमकार्डचा वापर आर्थिक फसवणुकीसाठी करण्यात आला आहे. दूरसंचार विभागाला जारी केलेल्या सूचनांमध्ये, पीएमओने बनावट कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड जारी करणाऱ्या कोणत्याही सिमकार्ड विक्रेत्याची ओळख पटवण्यास सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
SIM Card Rules:PMO चा नवा आदेश! सिम कार्डच्या नियमांमध्ये झाले बदल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement