हा आहे Jio चा सर्वात स्वस्त 28 दिवसांचा प्लॅन, फायदेही मिळतील भरपूर

Last Updated:

Reliance Jio 28 Days Best Plan: अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा सोबत, OTT ॲप्सचं सब्सक्रिप्शन देखील Jio च्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणताही प्लॅन रिचार्ज करू शकता. आज आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत जिची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे.

जिओ
जिओ
Reliance Jio Best Calling Plan: तुम्ही जिओ यूझर्स असाल आणि तुम्हाला कमी किमतीत अधिक व्हॅलिडिटी असलेला प्लॅन हवा असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जिओ ही देशातील एक सुप्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे, जी आपल्या यूझर्सला वेगवेगळ्या किंमतींमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा सोबत, OTT ॲप्सचं सब्सक्रिप्शन देखील Jio च्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणताही प्लॅन रिचार्ज करू शकता. आज आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्याची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे.
Jio चा 28 दिवसांचा स्वस्त प्लॅन
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. तुम्ही जिओच्या पोर्टफोलिओकडे काळजीपूर्वक पाहिल्यास, तुम्हाला सर्वात कमी किमतीत 28 दिवसांची व्हॅलिडिटी देणारा प्लॅन सापडेल. या प्लॅनची ​​किंमत 189 रुपये आहे आणि हा प्लॅन तुम्हाला जिओच्या वेबसाइटवरील व्हॅल्यू सेक्शनमध्ये मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याचा अर्थ तुम्ही देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके कॉल करू शकाल.
advertisement
प्लॅनचे फायदे
डेटाबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 2 GB हाय स्पीड डेटा मिळतो. जो इंटरनेट वापरण्यासाठी वापरला जाऊ शकतो. याशिवाय यूजर्सना एकूण 300 टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सुविधाही मिळते. या व्यतिरिक्त यूझर्सना या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.
advertisement
कॉलिंगसाठी परवडणारा प्लॅन
ज्या यूझर्सना जास्त इंटरनेटची गरज नाही आणि कॉलिंगसाठी परवडणारा प्लॅन हवा आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला ठरू शकतो. जर तुम्हाला हा प्लॅन रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही जिओच्या अधिकृत वेबसाइट, माय जिओ ॲप आणि गुगल पे, फोन पे इत्यादी ऑनलाइन पेमेंट ॲप्सद्वारे रिचार्ज करू शकता.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
हा आहे Jio चा सर्वात स्वस्त 28 दिवसांचा प्लॅन, फायदेही मिळतील भरपूर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement