Smartphone मधील हे सिक्रेट कोड आताच करा ऑन! Wifiसह डिव्हाइसही होईल फास्ट

Last Updated:

Smartphone Secret Codes: तुम्हालाही तुमच्या अँड्रॉईड फोनमधील Wifi किंवा फोनचा स्पीड वाढवायचा असेल तर आताच हा सिक्रेट कोड वापरा. या कोड्सद्वारे तुमची समस्या फ्री सोडवली जाऊ शकते.

स्मार्टफोन सिक्रेट कोड
स्मार्टफोन सिक्रेट कोड
Smartphone Secret Codes: आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही तुमच्या डिव्हाइसमधील काही खास सिक्रेट कोड डायल करून तुमच्या डिव्हाइसची कार्यक्षमता आणखी सुधारू शकता. होय, तुम्ही सिक्रेट कोड एंटर करताच, तुमचा फोन अधिक चांगले काम करण्यास सुरवात करेल. खरंतर, हे कोड एक प्रकारे तुमचं डिव्हाइस रिफ्रेश करतात. ज्यामुळे अनावश्यक बॅकग्राउंड फाइल्स बंद होतात आणि फोन पूर्वीपेक्षा फास्ट चालतो. आम्ही तुम्हाला अशाच दोन सिक्रेट कोडबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही फोनचा परफॉर्मन्स तर वाढवू शकताच पण वायफायचा स्पीडही वाढवू शकता. या दोन कोडबद्दल जाणून घेऊया...
WiFi स्पीड बूस्ट कोड
हे कोड तुमच्या डिव्हाइसचे WiFi रीफ्रेश करतात, जे तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगला वेग देतात. या कोडचे काम WiFi चं व्हर्जन रीफ्रेश करणे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या डायल पॅडवर जाऊन *#2663# डायल करावे लागेल. असे केल्यावर तुमच्या फोनमध्ये एक सेटिंग ओपन होईल. आता तुम्हाला फोनच्या काही सिक्रेट सेटिंग्ज दिसतील. येथून तुम्हाला मध्यभागी 'WiFi व्हर्जन रिफ्रेश' ऑप्शन देखील दिसेल. त्यावर क्लिक करताच तुमचा फोन आपोआप रीस्टार्ट होईल. अशा परिस्थितीत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, फक्त थोडी प्रतीक्षा करा आणि आता फोन चालू होताच डिव्हाइसचा WiFi वेग सुधारेल.
advertisement
फोन फास्ट करण्यासाठी कोड
दुसरा कोड देखील खूप पॉवरफूल आहे. जो आपल्या डिव्हाइसची बॅकग्राउंड प्रोसेस आणि कॅशे क्लियर करण्यासाठी काम करतो. हा कोड टाकताच फोनची सिक्रेट सेटिंग ऑन होते. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये *#9900# डायल करावे लागेल. तुम्ही हे डायल करताच, “Dump State Log” किंवा “Clear Cache” चा ऑप्शन दिसेल. फक्त एकदा या ऑप्शनवर क्लिक करा. असे केल्याने तुमच्या फोनचा परफॉर्मेंस वाढेल.
advertisement
फोनचा स्पीडही याप्रमाणे वाढवा
तुम्ही खूप ॲप्स वापरत असल्यास, यामुळे तुमचा फोन स्लो होऊ शकतो. त्यामुळे बॅकग्राउंड ॲप्स पहा आणि तुम्ही अधूनमधून वापरत असलेले ॲप्स बंद करा. जितकी जास्त ॲप्स RAM मध्ये राहतील, तितकी फोनची कार्यक्षमता कमी होईल. त्याच वेळी, जर तुम्ही फोनमधील कॅशे क्लिअर करणारे ॲप्स वापरत असाल तर ते आता काढून टाका. फक्त कोड पद्धत वापरून कॅशे क्लिअर करा.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Smartphone मधील हे सिक्रेट कोड आताच करा ऑन! Wifiसह डिव्हाइसही होईल फास्ट
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement