Police Bharti :मोठी बातमी! ठाणे शहरात 654 पोलिस पदांची भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Last Updated:

Thane Police Bharti 2025 : ठाणे पोलिस आयुक्तालयात मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यभरातील तरुणांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार असून अर्ज करण्याची अंतिम कोणती आहे ते सविस्तर जाणून घ्या.

Thane police bharti
Thane police bharti
ठाणे : राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने राज्य पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यभरात तब्बल 15,300 पदांसाठी भरती जाहीर झाली असून त्यापैकी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात 653 जागा भरण्यात येणार आहेत..
पोलिस दलात जाण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण
ठाणे पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर '' mahapolice.gov.in'' या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल. इच्छुकांना अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. महत्त्वाचे म्हणजे शुल्काची रक्कम सर्वसाधारण प्रवर्गासाठी 450 रुपये आहे तर मागास प्रवर्गासाठी 350 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
पात्रता निकष कसे असतील?
उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा तसचे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी असावा.
भरती प्रक्रिया कशी असेल?
या भरतीत 100 गुणांची शारीरिक चाचणी आणि 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. शारीरिक चाचणीमध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक या घटकांचा समावेश असेल तर लेखी परीक्षेत सामान्यज्ञान, बुद्धिमापन, अंकगणित आणि चालू घडामोडींवरील प्रश्न विचारले जाणार आहेत.
advertisement
कागदपत्रांची योग्यती पडताळणी आणि शारीरिक चाचणी पार पडल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. दोन्ही परीक्षांतील गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेबाबत बोलताना ठाणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) श्रीकांत पाठक म्हणाले, ठाणे आयुक्तालयातील भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असेल. सक्षम आणि जबाबदार उमेदवारांना संधी मिळावी हा आमचा उद्देश आहे.
advertisement
या भरतीमुळे ठाणे शहरातील अनेक तरुणांसाठी पोलिस दलात सामील होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांनी अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Police Bharti :मोठी बातमी! ठाणे शहरात 654 पोलिस पदांची भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement