कोल्हापूर : पुराने वेढलं, झाडावर अडकली माकडं; पुराच्या पाणातून पोहोचवली केळी

Last Updated : कोल्हापूर
कोल्हापूर, ज्ञानेश्वर साळोखे : असूर्ले इथे महापुरात माकडांचा कळप अडकून पडला आहे.चहूबाजूला पाणीच पाणी असल्याने माकडांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांची कासावीस वाढली आहे.वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाला याची माहिती मिळताच त्यांनी या माकडांच्या बचावासाठी काम सुरू केले आहे.पाण्यातून माकडांना बाहेर काढणे सध्या शक्य नसल्याने त्यांना खाद्य पदार्थ देऊन जिवंत ठेवण्याचे काम आता वनविभागाने हाती घेतले आहे.त्यासाठी रोज 20 डझन केळी बोटीतून पुरवली जात आहे.झाडावर खोका ठेऊन त्यात केळी ठेवून त्यांना अन्न पुरवठा करण्याचे काम सध्या सुरू आहे.संकटाच्या काळात वनविभागाने माकडांना माणुसकीचे दर्शन देत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
कोल्हापूर : पुराने वेढलं, झाडावर अडकली माकडं; पुराच्या पाणातून पोहोचवली केळी
advertisement
advertisement
advertisement