मुंबई: विजयादशमीला आपण सर्वजण सोनं म्हणजेच आपट्याची पाने देऊन सणाचा आनंद साजरा करतो. हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी शुभ कार्य केले जाते तसेच लोक सहसा सोने खरेदी करतात. पण, “सोनं घ्या, सोनं द्या, सोन्यासारखे रहा” असा संदेश देण्याची प्रथा, त्याची सुरुवात कधी आणि का झाली, यामागे काही शास्त्रीय तसेच पौराणिक कारणे आहेत. या संदर्भात आदित्य जोशी गुरुजी यांनी लोकल 18 सोबत संवाद साधताना यामागील सर्व पारंपरिक कारणे स्पष्ट केली.