मुंबई : दादर परिसरात सध्या एका खास स्टॉलने खरेदीदारांचे लक्ष वेधून घेतले असून येथे उसळलेली गर्दी चर्चेचा विषय ठरत आहे. कारण बाजारात साधारणतः 1000 ते 1200 रुपयांना मिळणारे आकर्षक आणि फॅशनेबल चिकनकारी कुर्ते या स्टॉलवर अवघ्या 300 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कमी दरात उत्तम दर्जाचे कपडे मिळत असल्यामुळे महिलांमध्ये या स्टॉलला विशेष पसंती मिळत आहे.



