Maghi Purnima 2026: माघी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व; बत्तीसपट लाभ, फेब्रुवारीची सुरुवात या गोष्टींसाठी लाभदायी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Maghi Purnima 2026: पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णू स्वतः प्रयागमध्ये स्नान करण्यासाठी येतात आणि तिथे आलेल्या भक्तांची सर्व संकटे दूर करतात. स्नानाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायी मानले जाते.
मुंबई : अमावस्या-पौर्णिमा तिथींना हिंदू धर्मात महत्त्व दिलं गेलं आहे. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे संबोधले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कर्क राशीत आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा माघी पौर्णिमेचा योग जुळून येतो. नक्षत्रमंडळातील माघ नक्षत्रावरून या पौर्णिमेचे नाव पडले आहे. या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी केलेल्या दानधर्माचे फळ 32 पट अधिक मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. पुत्रप्राप्ती आणि अखंड सौभाग्य देणारी ही पौर्णिमा व्यक्तीला सर्व दुःखांतून मुक्त करून मोक्षाकडे नेते. या वर्षी 1 फेब्रुवारी 2026 रोजी माघी पौर्णिमा साजरी केली जाईल.
माघी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व - या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केली जाते. काही ठिकाणी भाविक या दिवशी व्रत करून सत्यनारायणाची पूजा करतात, ते व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. माघी पौर्णिमेला गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. खासकरून नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने सूर्य आणि चंद्राशी संबंधित दोषांपासून मुक्ती मिळते, म्हणूनच या दिवसाला पुण्य योग असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णू स्वतः प्रयागमध्ये स्नान करण्यासाठी येतात आणि तिथे आलेल्या भक्तांची सर्व संकटे दूर करतात. स्नानाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायी मानले जाते.
advertisement
दानधर्माचे महत्त्व - हिंदू पंचांगातील 11 व्या महिन्यात म्हणजेच माघ महिन्यात दानाला खूप महत्त्व आहे. माघी पौर्णिमेला तिळाचे दान करणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. याशिवाय वस्त्र, अन्न, गूळ, कापूस, तूप, लाडू आणि फळांचे दानही केले जाते. मत्स्य पुराणानुसार, जो व्यक्ती माघी पौर्णिमेच्या शुभ दिवशी ब्राह्मणांना आणि गरजूंना दान करतो, त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊन मोक्ष मिळतो. या दिवशी केलेले दान पुण्य वाढवण्यासोबतच कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासही मदत करते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 1:17 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Maghi Purnima 2026: माघी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व; बत्तीसपट लाभ, फेब्रुवारीची सुरुवात या गोष्टींसाठी लाभदायी










