दारूचं व्यसन सोडवणारं औषध, एकाच गोळीमुळे दिसेल कमाल, किंमत किती?

Last Updated:

शास्त्रज्ञांनी एक औषध तयार केलंय ज्याच्या मदतीने दारूचं व्यसन सोडवता येऊ शकतं. लोक याला ‘चमत्कारी गोळी’ म्हणतात

pill can reduce alcohol addiction
pill can reduce alcohol addiction
नवी दिल्ली :  जगभरात दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकदा दारू पिण्याचं व्यसन लागलं की ते सहज सुटत नाही. दारूमध्ये अल्कोहोल असतं, जे शरीरासाठी अतिशय घातक असतं. दारूमुळे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. मात्र, आता शास्त्रज्ञांनी एक औषध तयार केलंय ज्याच्या मदतीने दारूचं व्यसन सोडवता येऊ शकतं. लोक याला ‘चमत्कारी गोळी’ म्हणतात. हे औषध कसं काम करतं आणि त्याची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात.
ब्रिटिश वेबसाईट ‘द इंडिपेंडंट’च्या रिपोर्टनुसार, दारूचं व्यसन सोडवण्यासाठी जी गोळी तयार करण्यात आली आहे, तिचे नाव नॅलट्रेक्सॉन (naltrexone) आहे. या गोळीचा वापर दारू आणि नशेच्या पदार्थांची इच्छा कंट्रोल करण्यासाठी केला जातो. शास्त्रज्ञांच्या मते, हे औषध दारू पिण्याच्या एक तासाआधी घेतल्यास खूप दारू पिणारेही कमी दारू पितील. त्यांना दारू प्यावी वाटणार नाही. ही गोळी दारूचे व्यसन सोडवण्यासाठी खूप फायद्याची ठरेल, असा दावा केला जात आहे.
advertisement

कशी काम करते गोळी?

तज्ज्ञांच्या मते, या गोळीचं मुख्य कार्य मेंदूतील त्या सिग्नल्सना प्रभावित करणं आहे जे दारू पिण्याची इच्छा कंट्रोल करतात. ही गोळी शरीरातील डोपामाइन लेव्हल बॅलन्स करण्यास मदत करते, ज्यामुळे व्यक्तीची दारू पिण्याची इच्छा कमी होते. ही एक न्यूरोकेमिकल प्रक्रिया आहे, ज्यामुळे व्यक्ती अल्कोहोलशिवाय देखील समाधानी असल्याचा अनुभव घेऊ शकते. हे दारूचं व्यसन कंट्रोल करतं, ज्यामुळे मेंटल हेल्थ सुधारते. या गोळीमुळे वजन कमी होऊ शकतं. या गोळीला 'ओझेम्पिक फॉर ड्रिंकिंग' म्हटलं जातंय. ओझेम्पिक वजन कमी करण्याचे लोकप्रिय औषध आहे.
advertisement

गोळीची किंमत किती?

या एका गोळीची किंमत जवळपास 300 रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, ही गोळी दिवसातून एकदा घ्यायची असते आणि त्याचे परिणाम दिसायला काही आठवडे लागू शकतात. दारूचं व्यसन सोडत नसलेल्या लोकांमध्ये या चमत्कारिक गोळीने नवी आशा जागवली आहे. मात्र या गोळीबद्दल सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. या गोळीचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे लोकांनी हे औषध फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं. स्वतःच ही गोळी घेणं हानिकारक ठरू शकतं.
advertisement

दारूमुळे दरवर्षी होतात 30 लाख मृत्यू: WHO

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) 2023 मध्ये दारूशी संबंधित विकार व दारूच्या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी ॲकॅम्प्रोसेट आणि नॅल्ट्रेक्सॉन या औषधांची शिफारस केली होती. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी 30 लाख जणांचा दारू प्यायल्याने मृत्यू होतो. तसेच कोट्यवधी लोकांचं आरोग्य बिघडतं. एका अंदाजानुसार, जगभरात सुमारे 30 कोटी लोकांना अल्कोहोल संबंधित विकार झाले असून, त्यापैकी 15 कोटी लोकांना दारूचं व्यसन जडलं असून, ते दारूवर अवलंबून आहेत. दारूमुळे कॅन्सरसह अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
दारूचं व्यसन सोडवणारं औषध, एकाच गोळीमुळे दिसेल कमाल, किंमत किती?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement