24 तासाचा वेळ देतो निर्णय मागे घ्या नाही तर...; डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला थेट धमकी, थरकाप उडवणारा इशारा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Donald Trump: अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव आता अधिकच गंभीर बनला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला थेट इशारा दिला आहे की त्यांनी 8 एप्रिलपर्यंत टॅरिफ वाढ मागे घेतली नाही, तर अमेरिका 9 एप्रिलपासून 50% अतिरिक्त टॅरिफ लावणार. या घोषणेमुळे जागतिक बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे.
वॉशिंग्टन: अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ युद्ध अधिक तीव्र बनले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर तीव्र टीका करत 9 एप्रिल 2025 पासून चीनवर 50 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी 7 एप्रिल रोजी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.
ट्रम्प यांनी म्हटले की, चीनने 34 टक्के नवीन टॅरिफ लावले आहेत. जे आधीच लागू असलेल्या जादा कर, नॉन-कॅश शुल्क, कंपन्यांना देण्यात येणाऱ्या बेकायदेशीर सबसिडी आणि चलन हेराफेरीच्या पार्श्वभूमीवर अजूनही त्रासदायक ठरत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, हे सर्व मी आधीच दिलेल्या इशाऱ्यानंतर झाले आहे. मी स्पष्टपणे सांगितले होते की, जो कोणी देश अमेरिकेविरुद्ध अतिरिक्त शुल्क लावेल. त्यांना याचा गंभीर फटका बसणार आहे.
advertisement
ट्रम्प यांनी स्वत:च्या घरातच आग लावली, अमेरिकी शेअर बाजारात महाभयंकर घसरण
ट्रम्प यांनी इशाऱ्यात पुढे असे म्हटले आहे की, जर चीनने 8 एप्रिलपर्यंत ही 34% टॅरिफ वाढ रद्द केली नाही, तर अमेरिका 9 एप्रिलपासून 50% अतिरिक्त टॅरिफ लागू करेल. यासोबतच चीनसोबत प्रस्तावित कोणतीही बैठक थांबवली जाईल आणि इतर देशांशी नव्या वाटाघाटी तत्काळ सुरू होतील, अशीही त्यांनी धमकी दिली आहे.
advertisement
सोन्याच्या बाजारात जपानचा 'सर्जिकल स्ट्राईक'; ट्रम्पच्या टॅरिफ प्लॅनला झटका
view commentsट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अमेरिका-चीन व्यापार संबंधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 07, 2025 9:46 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
24 तासाचा वेळ देतो निर्णय मागे घ्या नाही तर...; डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला थेट धमकी, थरकाप उडवणारा इशारा


