ट्रम्प यांनी स्वत:च्या घरातच आग लावली, अमेरिकी शेअर बाजारात महाभयंकर घसरण; गुंतवणूकदारांमध्ये भीती
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
US Stock Market Crash: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या नव्या टॅरिफमुळे जागतिक शेअर बाजारात भीषण घसरण झाली आहे. डाऊ जोन्स 1,343 अंकांनी कोसळला असून S&P 500 आणि Nasdaq मध्येही मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग गडद होत आहेत.
न्यूयॉर्क: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या नव्या टॅरिफनी अमेरिकन आणि जागतिक शेअर बाजारात जबरदस्त खळबळ उडवली आहे. सोमवारी सकाळी (अमेरिकन वेळेनुसार 9:35 AM) Dow Jones Industrial Average तब्बल 1,343 अंकांनी घसरला. म्हणजेच 3.5 टक्क्यांची मोठी घसरण झाली. तर Nasdaq Composite 4.2 टक्क्यांनी खाली गेला. ही घसरण दिवसागणिक वाढत असून गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड काळजी निर्माण झाली आहे.
‘S&P 500’ देखील कोसळला
S&P 500 निर्देशांकही 3.8 टक्क्यांनी घसरला आणि हा गेल्या काही वर्षांतील सर्वात वाईट आठवडा ठरला आहे. करोनानंतर मार्च 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का दिल्यानंतर एवढी मोठी घसरण यापूर्वी झाली नव्हती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विक्रमी शिखर गाठलेला हा निर्देशांक आता 20 टक्क्यांपेक्षा अधिक घसरला आहे.
advertisement
'Bear Market' ची भीती
गुंतवणूक क्षेत्रात जेव्हा एखादा निर्देशांक 20% पेक्षा जास्त घसरतो तेव्हा त्याला "Bear Market" असे म्हटले जाते. म्हणजे ही सामान्य 10% घसरण नसून दीर्घकालीन मंदीचा स्पष्ट इशारा असतो. S&P 500 हे निर्देशांक लाखो अमेरिकन गुंतवणूकदारांच्या 401(k) रिटायरमेंट प्लॅन्सचं केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्यातील घसरण म्हणजे सामान्य नागरिकांच्या बचतींनाही जबरदस्त फटका बसतो.
advertisement
घसरणीमागचं कारण?
-ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफ्समुळे व्यापार युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.
-या टॅरिफमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
-गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याने सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळण्याचा कल आहे.
काय पुढे होऊ शकतं?
view commentsजर ही घसरण अशीच चालू राहिली तर संपूर्ण अमेरिकन अर्थव्यवस्थेवर, त्याचबरोबर जगभरातील बाजारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. गुंतवणूकदार सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणजे बॉण्ड्स, सोने किंवा स्विस फ्रँक यांसारख्या पर्यायांकडे वळत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 07, 2025 8:04 PM IST
मराठी बातम्या/मनी/
ट्रम्प यांनी स्वत:च्या घरातच आग लावली, अमेरिकी शेअर बाजारात महाभयंकर घसरण; गुंतवणूकदारांमध्ये भीती


