पोलीस स्टेशनला गेल्या 2 तरुणी; लाजत सांगितली 'दिल की बात'; मागितलं असं काही, पोलीसही अवाक
- Published by:Priya Lad
Last Updated:
दोन तरुणींनी पोलिसांकडे असं काही मागितलं की त्यांचा विचित्र हट्ट पाहून पोलीसही अवाक झाले. एकदा तर पोलीस स्टेशन प्रभारींनीही दोघांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही.
राजस्थान : एक 20 वर्षांची तरुणी आणि एक 25 वर्षांची तरुणी. दोघीही मैत्रिणी. दोघी एकत्र पोलीस ठाण्यात गेला. पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. पोलिसांनी त्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर या तरुणींनी पोलिसांकडे असं काही मागितलं की पोलीसही गार पडले. राजस्थानमधील हे प्रकरण आहे.
पाली जिल्ह्यातील ही धक्कदायक घटना. रविवारी दोन तरुणी जैतपूर पोलीस ठाण्यात आल्या आणि पोलिसांसमोर त्यांनी एक मागणी केली. दोघांचा विचित्र हट्ट पाहून पोलीसही अवाक झाले. एकदा तर पोलीस स्टेशन प्रभारींनीही दोघांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी सुरुवातीला प्रथम आपल्या स्तरावर दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मुलींनी हट्ट काही सोडला नाही. त्या काही ऐकायला तयार नाही.
advertisement
अखेर पोलिसांनी तरुणींच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली. त्यांना घरच्यांशी फोनवर बोलायला लावलं. तरीही दोन्ही मुली डगमगल्या नाहीत. एवढंच नाही तर दोघांनीही घरी जाण्यास नकार दिला. अखेर दोघींना पाली येथील सखी केंद्रात आणण्यात आलंं तिथं त्यांचं समुपदेशन करण्यात येणार आहे.
advertisement
तरुणींनी असं मागितलं काय?
दोन्ही मुली शेजारी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आधी दोघांमध्ये मैत्री होती आणि आता या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आहे. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांच्या भीतीनं दोघांनी जैतपूर पोलीस ठाणं गाठलं. पोलीस स्टेशन प्रभारींना आपल्याला लग्न करायचं असलं सांगितलं.
Location :
Rajasthan
First Published :
Jun 19, 2024 8:31 AM IST
मराठी बातम्या/Viral/
पोलीस स्टेशनला गेल्या 2 तरुणी; लाजत सांगितली 'दिल की बात'; मागितलं असं काही, पोलीसही अवाक









