बाबा वेंगापेक्षा खतरनाक भविष्यवाणी, 2026 मध्ये होणार मोठ्या राजकीय नेत्याचा अंत; '26' च्या आकड्याचा भयावह अर्थ

Last Updated:

2026 Predictions: 2026 जवळ येत असताना नास्त्रेदमसच्या गूढ भविष्यवाण्यांनी पुन्हा एकदा जगभर खळबळ उडवली आहे. महाविनाश, युद्ध, सत्तांतर आणि मसीहाच्या उदयासारख्या संकेतांमुळे हे वर्ष मानवजातीसाठी निर्णायक ठरेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

News18
News18
नवीन वर्षाच्या आगमनाला आता काहीच दिवस उरले आहेत. अशा वेळी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे, ते म्हणजे 2026 वर्ष कसं असेल? हे वर्ष एखाद्या महाविनाशाचं ठरणार आहे का, की एखादा नवा मार्ग दाखवणारा मसीहा उदयाला येणार आहे? या प्रश्नांच्या धुक्यातच जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवक्ता नास्त्रेदमस यांची रहस्यमय भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नास्त्रेदमस यांनी ‘26’ या आकड्याशी संबंधित नेमकं काय संकेत दिले होते? त्यात मधमाश्यांचा उल्लेख का आहे? आणि या सर्वांचा 2026 शी नेमका काय संबंध जोडला जातो, हे जाणून घेऊया.
advertisement
1503 साली जन्मलेल्या मिशेल द नास्त्रेदमस यांनी Les Prophéties नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात त्यांनी चार ओळींच्या गूढ कविता किंवा दोहे लिहिले असून, त्यांना क्वाट्रेन (Quatrains) असं म्हटलं जातं. अनेकांचा असा विश्वास आहे की या ओळींमध्ये भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत लपलेले आहेत. नास्त्रेदमस यांच्याबद्दल असा दावा केला जातो की त्यांनी स्वतःच्या जन्मानंतर शेकडो वर्षांनी घडणाऱ्या घटनांची भविष्यवाणी या पुस्तकात आधीच केली होती. मात्र, त्यांची भाषा इतकी गुंतागुंतीची आणि प्रतीकात्मक आहे की त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात.
advertisement
नास्त्रेदमस यांनी 2026 या वर्षाचा थेट उल्लेख कुठेही केलेला नाही. तरीही, त्यांच्या पुस्तकातील ‘26 क्रमांकाच्या क्वाट्रेन’ ला अनेक जण 2026 वर्षाशी जोडून पाहत आहेत. या दोह्यात ते म्हणतात,
advertisement
I:26: “The great swarm of bees will ariseby night the ambush…” (“मधमाश्यांचा एक महान झुंड उभा राहील… रात्री अचानक घातपात होईल…”)
या कवितेत उल्लेख केलेल्या ‘मधमाश्यांच्या झुंडा’चा अर्थ नेमका काय? यावर अनेक तर्क मांडले जात आहेत. शब्दशः अर्थ घेतला तर ‘beesम्हणजे मधमाश्या, पण बहुतांश अभ्यासक याचा प्रत्यक्ष कीटकांशी संबंध नसल्याचं मानतात. काही तज्ज्ञांच्या मते, हा उल्लेख आधुनिक युद्धात वापरल्या जाणाऱ्या ड्रोनच्या झुंडींकडे इशारा करत असू शकतो. आजच्या काळात ड्रोन युद्धतंत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत आणि भविष्यात हे अधिक धोकादायक ठरू शकतात.
advertisement
दुसरीकडे, इतिहासाकडे पाहिल्यास नेपोलियनच्या काळात मधमाश्या साम्राज्य, सत्ता आणि शक्तीचं प्रतीक मानल्या जात होत्या. त्यामुळे काही लोक असा सवाल उपस्थित करत आहेत की, 2026 मध्ये एखादा शक्तिशाली नेता जागतिक राजकारणाचं चित्र बदलणार आहे का? काही जण तर डोनाल्ड ट्रम्प किंवा व्लादिमीर पुतिनसारख्या नेत्यांकडे याचा रोख असल्याचंही मानतात.
advertisement
नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाण्यांमध्ये टिसिनो (Ticino) या ठिकाणाचा उल्लेख करताना “रक्ताच्या नद्या वाहतील” असा संकेत दिला आहे. आजच्या काळात टिसिनो हे स्वित्झर्लंडमधील एक शांत आणि सुरक्षित शहर मानलं जातं. याशिवाय त्यांनी असंही लिहिलं आहे की “पश्चिमेकडील प्रकाश मावळेल” आणि “पूर्वेकडे तीन अग्नी पेटतील.”
advertisement
याचा अर्थ काही अभ्यासक असा लावतात की अमेरिका आणि युरोपसारख्या पश्चिमी शक्तींचा प्रभाव कमी होईल, तर आशिया म्हणजेच ‘पूर्वेकडील देशांचा’ उदय होईल. काही जण ‘प्रकाश मावळणे’ याचा अर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे निर्माण होणारी आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि सामाजिक अस्थिरता असाही काढतात.
एखाद्या महान व्यक्तीचा अंत?
नास्त्रेदमस यांच्या आणखी एका भयावह भविष्यवाणीत ते म्हणतात, एक महान व्यक्ती एका दिवसात वीजेच्या घावाने कोसळेल.” याचा अर्थ अनेक जण एखाद्या मोठ्या राजकीय किंवा जागतिक नेत्याच्या अचानक मृत्यूशी जोडून पाहत आहेत. त्यामुळे 2026 मध्ये एखादी मोठी राजकीय उलथापालथ किंवा जागतिक हादरा बसवणारी घटना घडेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या सर्व भीतीदायक संकेतांमध्येही लोकांना आशेचा किरण दिसतो. कारण नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाण्यांमध्येमॅन ऑफ लाईट’ म्हणजेच प्रकाशमान पुरुषाचा उल्लेख आहे. अनेकांचा विश्वास आहे की मोठ्या अराजकतेनंतर हा ‘मॅन ऑफ लाईट’ उदयास येईल आणि तो जगात शांतता, अध्यात्मिक जागृती आणि नवी दिशा घेऊन येईल.
या सर्व भविष्यवाण्या खऱ्या ठरतील की नाही, हे वेळच ठरवेल. मात्र, इतिहासात अनेक वेळा नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाण्यांचा लोकांनी अनुभव घेतल्यामुळे त्यांच्यावरील विश्वास टिकून आहे. तरीही, हेही तितकंच खरं आहे की त्यांच्या लेखनातील प्रतीकात्मक आणि गुंतागुंतीच्या भाषेमुळे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात आणि त्यामुळेच त्यांच्या भविष्यवाण्या आजही चर्चेचा विषय ठरतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बाबा वेंगापेक्षा खतरनाक भविष्यवाणी, 2026 मध्ये होणार मोठ्या राजकीय नेत्याचा अंत; '26' च्या आकड्याचा भयावह अर्थ
Next Article
advertisement
Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement