OMG! हे कसं झालं? लोको पायलटशिवाय धावू लागली ट्रेन; तीही रूळांऐवजी शेतात; Video Viral

Last Updated:

शेतात धावणारी ट्रेन तुम्ही कधी पाहिली आहे का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. लोको पायलट शिवाय ट्रेनचं इंजिन रुळांऐवजी शेतात धावू लागलं.

News18
News18
पाटणा : आजवर तुम्ही ट्रेनचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील. सामान्यपणे ट्रेन रुळांवर धावते. पण शेतात धावणारी ट्रेन तुम्ही कधी पाहिली आहे का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. लोको पायलट शिवाय ट्रेनचं इंजिन रुळांऐवजी शेतात धावू लागलं.
बिहारमध्ये घडलेली ही घटना. वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण दानापूर विभागातील गया जिल्ह्यातील वजीरगंज स्टेशन आणि कोल्हाना होल्ट दरम्यानच्या रघुनाथपूर गावातील आहे. बोगी आणि पायलट नसलेले इंजिन रुळावरून जात असताना स्टॉप ओलांडून शेतात थांबलं.
इथं पाहा व्हिडिओ 
कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ पाहण्यासाठी  इथं क्लिक करा. लोको पायलट ट्रेनखाली फिरत असताना लोको पायलटशिवाय इंजिन चालत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
advertisement
हे घडलं कसं?
लोको पायलट लूप लाइनवरून गयाच्या दिशेने इंजिन घेऊन जात असल्याचं सांगण्यात येत आहे. अचानक इंजिन लोको पायलटच्या नियंत्रणाबाहेर जाते. त्यानंतर इंजिनचा ब्रेक निकामी झाला आणि इंजिन चालूच राहिलं.
यादरम्यान लोको पायलट जीव वाचवण्यासाठी इंजिनमधून खाली उतरला. जोपर्यंत इंजिन चालू होते तोपर्यंत ट्रॅक संपत नव्हता, जिथं ही घटना घडली तिथं रेल्वे ट्रॅक टाकण्यात आला नव्हता आणि स्टॉपची चिन्हे बनवली होती, जी तोडत इंजिन शेतात पोहोचलं.
advertisement
इंजिन रुळावरून उतरून बाजूच्या शेतात जाताना दिसले. मात्र, काही वेळानंतर रेल्वेचे मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि काही तासांनंतर इंजिन पुन्हा रुळावर आणण्यात आलं.
मराठी बातम्या/Viral/
OMG! हे कसं झालं? लोको पायलटशिवाय धावू लागली ट्रेन; तीही रूळांऐवजी शेतात; Video Viral
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement