आता हेच बाकी होतं! कपलने बाळाचं नाव ठेवलं UPSC, कारण असं की हसून हसून पोट दुखेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Baby Name UPSC : एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका जोडप्याने त्यांच्या मुलाचं नाव UPSC ठेवण्यामागचं एक मजेदार कारण सांगितलं आहे.
नवी दिल्ली : यूपीएससी म्हणताच तुम्हाला साहजिकच माहिती आहे, ही भारतातील खूप मोठी आणि महत्त्वाची परीक्षा मानली जाते. याद्वारे देशाच्या प्रशासकीय सेवांमधील उच्च पदांसाठी निवड केली जाते. पण यूपीएससी हे एका बाळाचं नाव आहे, असं तुम्हाला सांगितलं तर. साहजिकच आश्चर्य वाटेल. यूपीएससी असं बाळाचं नाव कुणी ठेवल्याचं तुम्ही कधी ऐकलंच नसेल. पण एका कपलने असं केलं आहे. या कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका जोडप्याने त्यांच्या मुलाचं नाव UPSC ठेवण्यामागचं एक मजेदार कारण सांगितलं आहे.
दरवर्षी देशभरातून लाखो यूपीएससी परीक्षेची तयारी करतात आणि पहिल्या टप्प्यात फक्त काही हजार लोक निवडले जातात. तर अंतिम टप्प्यासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी एक ते दोन हजार उमेदवारांची निवड केली जाते जी पूर्णपणे उपलब्ध पदांच्या संख्येवर अवलंबून असते. इथं लोक आयएससारख्या अधिकारी पदांवर नोकरी मिळवण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ही परीक्षा खूप कठीण असते आणि अनेकांना दुसरं करिअर निवडावं लागतं. व्हिडिओमध्ये असंच एक जोडपं दाखवण्यात आलं आहे ज्यामध्ये पती-पत्नी दोघंही यूपीएससी परीक्षेसाठी उमेदवार आहेत. ज्यांनी आपल्या बाळाचं नावही यूपीएससी ठेवलं आहे.
advertisement
व्हिडिओमध्ये आपल्याला एक जोडपं उभं असलेलं दिसतं, ज्यामध्ये तो माणूस हातात एक मूल धरून आहे. एका पत्रकाराने त्याला विचारलं की तू तुझ्या मुलाचं नाव यूपीएससी का ठेवलं? तो माणूस म्हणतो की तो आणि त्याची पत्नी दोघंही यूपीएससीची तयारी करत होते आणि दोघंही UPSC उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. म्हणजेच दोघंही त्या परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत.
advertisement
व्हिडिओमध्ये तो माणूस सांगतो की दोघांनी लग्न केलं आणि त्यांच्या मुलाचं नाव यूपीएससी ठेवलं. त्यामुळे ते आता लोकांना सांगू शकतात की, “आम्ही देखील UPSC उत्तीर्ण झालो आहोत”, याचा अर्थ असा की त्यांना UPSC नावाचं एक मूल आहे. पण लोक सामान्यतः यूपीएससी उत्तीर्ण होण्याचा अर्थ परीक्षेतील यशाशी जोडतात.
advertisement
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अरविंद श्रीदेवी युझरने @arvind.sridevi या अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "यूपीएससी घोषित करण्यात आलं आहे."
हा मजेदार व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे आणि लोकांनी या जोडप्याला खूप शुभेच्छाही दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं, “भाऊ, तू जेईई आणि नीट परीक्षा कधी देत आहेस?” एकाने लिहिलं, “बरोबर आहे, यामध्ये निवृत्तीची कोणतीही शक्यता किंवा धोका नाही.” तर काही लोकांनी की यूपीएससीची थट्टा केली जात असल्याची टीकाही केली आहे.
Location :
Delhi
First Published :
June 01, 2025 2:02 PM IST