15 अब्ज रुपयांची लॉटरी जिंकले नवरा-बायको अन् उद्ध्वस्त झाला संसार; नेमकं घडलं काय?

Last Updated:

पैशाने आनंद विकत घेता येतो असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुमचे डोळे उघडेल. एका जोडप्याला पंधरा अब्ज रुपयांची लॉटरी लागली. पण अवघ्या दीड वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

फोटो - PA
फोटो - PA
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर :  नवरा-बायकोत भांडणं होणं सामान्य आहे. भांडण नाही तर नात्यात मजा नाही, असं कित्येक कपल म्हमतात. पती-पत्नी भांडतात आणि नंतर काही काळानंतर त्यांचं प्रेम या भांडणावर भारी पडतं. जगातील बहुतेक जोडप्यांमध्ये भांडण होण्याचं मुख्य कारण म्हणजे पैसा. कधी पतीच्या पैशाची उधळपट्टी केल्यामुळे पत्नीला राग येतो तर कधी पती आपल्या  खर्चिक बायकोमुळे भांडतो. असंच एक कपल ज्याना अब्जो रुपयांची लॉटरी लागली पण त्यांच्या संसारात सुख येण्याऐवजी तो उद्ध्वस्त झाला.
गिलियन बेडफोर्ड नावाच्या महिलेने आपल्या संसाराची ही कहाणी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिनं आणि तिच्या पतीनं लॉटरी जिंकली. लॉटरी कमी नाही तर तब्बल 15 अब्ज रुपयांहून अधिक किमतीची लॉटरी जिंकली होती. पण ही लॉटरी जिंकल्यानंतर हळूहळू त्याच्या आयुष्यातली सगळी नाती संपुष्टात आली. परिस्थिती अशी बनली की शेवटी त्यांचाही घटस्फोट झाला.
advertisement
गिलियनने तिच्या माजी पतीसह 2012 मध्ये पंधरा अब्ज रुपयांहून अधिक किमतीची लॉटरी जिंकली. मात्र अवघ्या पंधरा महिन्यांतच दोघांचा घटस्फोट झाला. गिलियनने सांगितलं की, पतीपासून वेगळं झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनीही तिच्यासोबतचं नातं तोडलं. गिलियनने तिच्या जिंकलेल्या रकमेपैकी दोन अब्ज रुपयेही तिच्या कुटुंबाला दिले. पैसे घेतल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी गिलियनला एकटं सोडलं.
advertisement
लॉटरीची कहाणी जगाला सांगताना गिलियनने शेअर केले की या पैशातून तिनं तिच्या कुटुंबाचे कर्ज फेडले. पण तिच्या आई-वडिलांनी पैशांसमोर मुलीच्या आनंदाकडे दुर्लक्ष केले. तिच्या वडिलांना गिलियनचा व्यवसाय घ्यायचा होता. जेव्हा गिलियनने हे केलं नाही तेव्हा तिच्या कुटुंबाने सर्व संबंध तोडले. मुलीने लॉटरी जिंकण्यापूर्वी तिचं कुटुंब एका कारवाँमध्ये राहत होते. तर नंतर त्यांनी घर, कार खरेदी केली. मात्र मुलीने पैसे देण्यास नकार दिल्यानें त्यांनी सर्व संबंध तोडले.
advertisement
आता गिलियन पती आणि कुटुंबाशिवाय एकटीच राहते.
मराठी बातम्या/Viral/
15 अब्ज रुपयांची लॉटरी जिंकले नवरा-बायको अन् उद्ध्वस्त झाला संसार; नेमकं घडलं काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement