Cyclone michaung - मिचॉन्ग म्हणजे काय? चक्रीवादळाला कसं पडलं हे नाव?
- Published by:Priya Lad
Last Updated:
चक्रीवादळाला नाव कोण आणि कसं देतं यामागेही एक स्टोरी आहे.
aनवी दिल्ली, 05 डिसेंबर : बंगालच्या उपसागरातून आलेल्या मिचॉन्ग चक्रीवादळाने भारतात हाहाकार माजवला आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकलं. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाचे परिणाम काय काय झाले याचे फोटो आणि व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण मिचॉन्ग हे नावच या वादळाला कसं पडलं, याचा अर्थ काय? याचा विचार तुम्ही केला.
जेव्हा जेव्हा चक्रीवादळ येतं तेव्हा तेव्हा त्याला एक नाव दिलं जातं. चक्रीवादळाला नावं कशी पडतात यामागेसुद्धा एक स्टोरी आहे. तसंच मिचॉन्ग या नावातही एक अर्थ दडला आहे. आता हे सविस्तरपणे आपण पाहुयात.
युनायटेड नेशन्स एजन्सी जागतिक हवामान संघटना (WMO) च्या मते, एका विशिष्ट भौगोलिक स्थानावर किंवा संपूर्ण जगामध्ये एका वेळी एकापेक्षा जास्त चक्रीवादळ असू शकतात आणि ते एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ ती राहू देखील शकतात. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी हे प्रयोजन करण्यात आलं आहे.
advertisement
सुरुवातीला वादळांना कोणताही देश नावं देऊ शकत होता, मात्र त्यामुळे गोंधळ होऊ लागला नंतर, हवामानशास्त्रज्ञांनी अधिक संघटित आणि कार्यक्षम प्रणाली अंतर्गत एका यादीतून वादळांची नावे देण्याचा निर्णय घेतला.
चक्रीवादळाला नावं कोण आणि कसं देतं?
जागतिक मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन (ESCAP), 13-राष्ट्रीय संस्था, जगभरात चक्रीवादळांना नाव देतात. WMO आहे आणि ESCAP मध्ये समाविष्ट 13 देशांमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन यांचा समावेश आहे.
advertisement
प्रत्येक देश वादळाला नाव देतो. आठ अक्षरांपेक्षा जास्त हे नाव असू नये अशी एक नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. ते लिंग, राजकारण, धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतींबाबत तटस्थ असतात. हे नाव कोणत्याही देशाचा अपमान करणारे नसावं असंही यामध्ये म्हटलं आहे. एकदा एखादे नाव वापरले की ते पुन्हा वापरता येत नाही. देशांनी दिलेल्या नावांची यादी तयार केली आहे.
advertisement
मिचॉन्ग हे नाव कुणी दिलं त्याचा अर्थ काय?
मिचॉन्ग हे नाव म्यानमारने दिलं. मिचॉन्ग हा म्यानमार भाषेतील शब्द आहे. ज्याचा अर्थ आहे ताकद आणि लवचिकता.
Location :
Delhi
First Published :
Dec 05, 2023 7:10 PM IST









